39 लग्न करणारा भारतीय पुरुष, प्रत्येक बायकोला दिलं भरभरून प्रेम, जन्माला घातली एकूण 94 मुलं

Last Updated:

Man married 39 women : भारतात एक पत्नी असताना कायद्याने दुसरं लग्न मान्य नाही. तरी काही पुरुषांनी दोन लग्न केल्याची प्रकरणं आहेत. एक असा पुरुष ज्याने तब्बल 39 लग्नं केली.

News18
News18
दिल्ली : एखाद्या व्यक्तीने एकापेक्षा जास्त वेळा लग्न केल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं किंवा ऐकलं असेल. अशा लोकांच्या आयुष्यात खूप समस्या असतात. सामान्य माणूस एका पत्नीलाही सांभाळू शकत नाही, परंतु अनेक पत्नी ठेवणं खरोखरच आव्हानात्मक असेल. पण काही पुरुष अनेक बायका सांभाळण्यात तज्ज्ञ असतात. असाच तज्ज्ञ भारतातील झिओना चाना.
मिझोरममधील झिओनाने दोन नाही, तीन नाही तर एकूण 39 लग्न केली. 39 लग्न ऐकूनच तुम्हाला धक्का बसेल. पण यापेक्षाही मोठा धक्का म्हणजे त्यांच्या सगळ्या पत्नी एकाच घरात एकच छताखाली राहतात. या सर्व महिला बहिणींप्रमाणे प्रेमाने एकत्र राहतात.
advertisement
39 बायकांपासून त्यांना 94 मुलं झाली. काही लोक म्हणतात की जुआनाला 89 मुलं होती, परंतु अनेक ठिकाणी ही संख्या 94 आहे. त्याला 36 नातवंडंही आहेत. जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचा प्रमुख असल्याचा विक्रम झिओनाच्या नावावर आहे.
आता इतकी लग्न केली, इतक्या पत्नी, इतकी मुलं. राहण्यासाठी घरंही तितकंच मोठं हवं. यासाठी जुआनाने शंभर खोल्या असलेलं एक आलिशान घर बांधलं. या घराचं नाव चुआर थान रन आहे, ज्याचा अर्थ नवीन युगाचं घर आहे. जुआनामुळे अनेक पर्यटक राज्यात येतात.. एकाच घरात इतक्या सह-बायका एकत्र कशा राहू शकतात हे जाणून त्यांना आश्चर्य वाटायचं. पण जेव्हा लोक इथं आले तेव्हा त्यांना त्यांच्या बायकोंमधील प्रेम पाहून आश्चर्य वाटलं.
advertisement
झिओनाचं 2021 मध्ये निधन झालं. पतीच्या मृत्यूनंतरही त्यांच्या पत्नी वेगळ्या झाल्या नाहीत. त्या त्याच घरात एकाच छताखाली राहत आहेत.
मराठी बातम्या/Viral/
39 लग्न करणारा भारतीय पुरुष, प्रत्येक बायकोला दिलं भरभरून प्रेम, जन्माला घातली एकूण 94 मुलं
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement