लग्नाला यायचं हं! बेस्ट फ्रेंडच्या लग्नाचा मेसेज; 4 शहरं, 5 फ्लाइट करत 6 वर्षांनी पोहोचला मित्र
- Published by:Priya Lad
Last Updated:
Wedding Story : सोशल मीडियावर एका व्यक्तीने त्याच्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नात जाण्याचा अनुभव मांडला आहे. या व्यक्तीची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे
मुंबई : सध्या लगीनसराई सुरू आहे, जो तो लग्नाला जात आहे, तुम्हीसुद्धा कुणाच्या तरी लग्नाला गेला असाल किंवा जाणार असाल. त्यातही मित्राचं किंवा मैत्रिणीचं लग्न म्हणजे अधिकच खास. त्यासाठी किती तरी लोक सुट्टी टाकून आवर्जून लग्नाला जातात. अशीच एक व्यक्ती जी तिच्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नाला गेली. या व्यक्तीच्या बेस्ट फ्रेंडने तिला लग्नाचा मेसेज केला. यानंतर 4 शहरं, 5 फ्लाइट असं करत तब्बल 6 वर्षांनी ही व्यक्ती बेस्ट फ्रेंडच्या लग्नात पोहोचली आहे.
सोशल मीडियावर एका व्यक्तीने त्याच्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नात जाण्याचा अनुभव मांडला आहे. या व्यक्तीची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे. व्यक्तीने पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार ज्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नाला ही व्यक्ती गेली त्यांच्यात लग्नाबाबत मोबाईलवर 6 वर्षांपूर्वी चॅटिंग झालं होतं.
advertisement
एक्स अकाऊंटवर शेअर केलेल्या पोसटमध्ये व्यक्तीने सांगितलं की, 6 वर्षांपूर्वी मी माझ्या बेस्ट फ्रेंडला वचन दिलं होतं की काहीही झालं तरी मी तिच्या लग्नाला येणार. त्यानंतर मी तिला 3 महिने आधी कळव, असं विनोदाने म्हणत राहिलो आणि यावर्षी तिने मला तिच्या लग्नाचं खरंच आमंत्रण पाठवलंच. सोबत त्या चॅटचा स्क्रीनशॉटही पाठवला, ज्यात मी तिला लग्नाला येणार असल्याचं वचन दिलं होतं.
advertisement
"गेल्या 10 दिवसांत 4 शहरं आणि 5 फ्लाइट्स, मी आज ते वचन पाळलं", असं म्हणत विमानतळावर जाताना त्याने त्याच्या सामानाचा फोटो देखील शेअर केला. त्याने चेन्नई, बंगलुरू, दिल्ली, सॅन फ्रान्सिस्को आणि मुंबई असा प्रवास केल्याचं नमूद केलं.
advertisement
आता हे वाचल्यानंतर 5 फ्लाइट्स बदलाव्या लागल्या, अशी या व्यक्तीची बेस्ट फ्रेंड जगाच्या कोणत्या कोपऱ्यात राहते किंवा तिचा लग्न होतं कठे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हाच प्रश्न एका युझरने या पोस्टच्या कमेंटमध्ये विचारला. तेव्हा या व्यक्तीने ती आता अमेरिकेत राहते पण तिचं लग्न मुंबईत होतं असं सांगितलं. असल्याचं सांगितलं. तसंच ही व्यक्ती स्वतः चेन्नईत राहते. त्यामुळे आणखी एका युझरने थेट चेन्नईहून मुंबईला का नाही गेलात असं विचारलं. तेव्हा या व्यक्तीने त्याचे 10 दिवस 4 शहरं 5 फ्लाइट्स कसे काय हे सविस्तर सांगितलं आहे. त्याने 5 फ्लाइट्स आपल्या कामाशी संबंधित असल्याचं सांगत आपल्या प्रवासाची सविस्तर माहितीही दिली.
advertisement
तुम्ही कुणाच्या लग्नात अशा पद्धतीने प्रवास केला आहे का? किंवा तुमचा असा काही अनुभव आहे का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 17, 2025 7:00 AM IST
मराठी बातम्या/Viral/
लग्नाला यायचं हं! बेस्ट फ्रेंडच्या लग्नाचा मेसेज; 4 शहरं, 5 फ्लाइट करत 6 वर्षांनी पोहोचला मित्र


