छोट्याशा टपरीवर नोकरीची संधी; Momo बनवण्यासाठी हेल्परची गरज; पगार पाहून नेटकरी थक्क
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
या दुकानासाठी लागणाऱ्या हेल्परचं पॅकेज जाणून तुम्हीही चकित व्हाल.
नवी दिल्ली : कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं की जवळपास प्रत्येकजण नोकरीच्या किंवा काहीतरी व्यवसाय करण्याच्या तयारीला लागतो. कॉलेजमध्ये इतरांचे जॉब पाहून असं वाटतं, की आपल्यालाही सहज नोकरी आणि चांगला पगार मिळेल. मात्र, जेव्हा प्रत्यक्षात नोकरी करण्याची वेळ येते, तेव्हा वास्तव समोर येतं. एवढं शिक्षण घेऊन, त्याच्यावर खर्च करून अगदी कमी पगारात नोकरी करावी लागली की अनेकांचा हिरमोड होतो. मात्र, आता एक नोकरी चांगलीच चर्चेत आली आहे.
ही नोकरी आहे मोमोच्या दुकानावर हेल्परचं काम करण्याची नोकरी. विशेष म्हणजे इथे शिक्षणाची फार काही गरज नाही, असं असतानाही त्या तुलनेत पगार मात्र भरपूर दिला जातोय. या दुकानासाठी लागणाऱ्या हेल्परचं पॅकेज जाणून तुम्हीही चकित व्हाल. एक्स (पूर्वी ट्विटर) वापरकर्ता अमृता सिंहने देसी मोमो शॉपची जाहिरात शेअर केली आहे, जी पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. जाहिरात चकित करणारी आहेच. यात दिसतं की, मोमोच्या दुकानात एका हेल्परची गरज आहे, ज्यासाठी त्याला खूप मोठा पगार देऊ केला जाणार आहे. जाहिरातीनुसार, निवडलेल्या व्यक्तीला दरमहा २५,००० रुपये दिले जातील.
advertisement

अमृताने कॅप्शनमध्ये लिहिलं , 'अरे हे काय आहे? हे मोमो शॉप भारतातील अनेक कॉलेजपेक्षाही चांगले पॅकेज देत आहे'. ही जाहिरात पाहिल्यानंतर अनेक यूजर्स इतके थक्क झाले की त्यांनी लगेचच त्यांच्या भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली. एका यूजरने मजेशीर कमेंट करत म्हटलं आहे, भाऊ, मी तर अप्लाय करणार आहे. अभ्यास करूनही तेवढा पगार मिळू शकला नाही. तर दुसरा म्हणाला, मी दोन वर्षांपासून काम करत आहे. पहिला पगार 10 हजार रुपये होता. ही जाहिरात पाहून असं वाटतं की आपण मोमोच्या दुकानातूनच सुरुवात करायला हवी होती. आणखी एका यूजरने लिहिलं आहे की, आमच्या भागात प्लंबरसुद्धा महिन्याला ५० हजार रुपये कमावतात. आणखी एक वापरकर्ता म्हणाला, हा तर TCS पेक्षा चांगल्या ऑफर देत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 10, 2024 2:23 PM IST
मराठी बातम्या/Viral/
छोट्याशा टपरीवर नोकरीची संधी; Momo बनवण्यासाठी हेल्परची गरज; पगार पाहून नेटकरी थक्क