Video : कोणी केस ओढले, तर कोणी फोडला फोन; सरकारी शाळेतील महिला शिक्षकांचं भांडण सोशल मीडियावर Viral
- Published by:Devika Shinde
Last Updated:
भांडणाचे व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा पाहिलं असेल, पण हा व्हिडीओ दोन महिला शिक्षकांमधील भांडणाचा आहे.
मुंबई : आजकाल सोशल मीडियावर शाळांमधील इव्हेंट्स, टॅलेंट्स, आणि अनेक प्रेरणादायी गोष्टींचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. पण याच डिजिटल दुनियेत कधी कधी अशा घटनाही समोर येतात ज्या शिक्षणसंस्थांमधील शिस्त आणि संस्कारांवरच प्रश्नचिन्ह उभं करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
हा भांडणाचा व्हिडीओ आहे. भांडणाचे व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा पाहिलं असेल, पण हा व्हिडीओ दोन महिला शिक्षकांमधील भांडणाचा आहे.
खरगोन जिल्ह्यातील एका शासकीय शाळेमधील हा व्हिडिओ आहे, जो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
2 मे रोजी, शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. मध्य प्रदेशमधील खरगोन जिल्ह्यातल्या एकलव्य शाळेतील महिला प्राचार्या प्रवीण दहिया आणि लाइब्रेरियन मधुरानी यांच्यातील वाद इतका टोकाला गेला की दोघी एकमेकींवर तावातावाने ओरडू लागल्या. त्या दोघींचं भांडण मारहाणीत रूपांतर झालं.
advertisement
ही मारामारी इतकी वाढली की पुढे केस ओढणं, लाथा बुक्या मारणं, एकमेकींचं डोकं भिंतीवर आपटणं आणि मोबाइल फोडणं असा सगळा ड्रामा हा अक्षरश: शाळेच्या कॅम्पसमध्येच घडला, जे कॅमेरात कैद झालं.
या घटनेचा व्हिडिओ शाळेतील इतर कर्मचाऱ्यांपुढे घडत होता. मात्र कोणीही त्या भांडणात मध्यस्थी करताना दिसलं नाही. उलट, काही जण या नाट्यमय प्रसंगाचं शूटिंग करत होते. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे.
advertisement
@nitendrasharma2 या युजरने X (पूर्वीचं ट्विटर) वर हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं – "खरगोनच्या एकलव्य शाळेत प्राचार्या आणि लाइब्रेरियन यांच्यात मारहाण, दोघींना शाळेतून हटवण्यात आलं आहे."
वादाचं मूळ काय?
मिळालेल्या माहितीनुसार, हे भांडण वैयक्तिक अहंकार आणि कामाच्या वाटपावरून झालेल्या मतभेदांमुळे उफाळून आलं. घटनेनंतर दोघींनीही एकमेकींच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आणि वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाल्या. प्रकरण जिल्हाधिकारीपर्यंत पोहोचल्यावर दोघींना त्यांच्या पदावरून हटवलं.
advertisement
ही शाळा केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत येते, त्यामुळे प्रकरणाची सविस्तर माहिती दिल्लीला पाठवण्यात आली आहे.
सोशल मीडियावर यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक यूजर्स म्हणत आहेत, “शिक्षकच जर असं वागतील, तर मग विद्यार्थ्यांनी काय शिकायचं?”
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 31, 2025 9:47 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Video : कोणी केस ओढले, तर कोणी फोडला फोन; सरकारी शाळेतील महिला शिक्षकांचं भांडण सोशल मीडियावर Viral