फक्त 3 फूटांत 3 मजली घर! देशी कारागिरांनी उभं केलं सर्वांत छोटं घर, VIDEO पाहून नेटकरी चकित
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
इंस्टाग्रामवर @smart_amroha नावाच्या अकाउंटवरून 3 फूट रुंदीच्या तीन मजली घराचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या घराला जगातील सर्वात लहान घर म्हटले जात आहे.
प्रत्येक जण आपल्या स्वप्नातील घरासाठी मनापासून मेहनत घेतो. इंजिनीअर्स त्याचा नकाशा तयार करतात आणि मग त्याचे प्रत्यक्षात बांधकाम होते. पण सध्या सोशल मीडियावर एका अनोख्या घराचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या घराची रुंदी केवळ तीन फूट आहे! चक्क गुलाबी रंगाचे हे घर पाहून नेटकरीही आश्चर्यचकित होत आहेत. अनेक जण प्रश्न विचारत आहेत की, अशा घरात राहणे शक्य तरी आहे का?
तीन मजली घर, पण अवघे तीन फूट रुंद!
या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, हे घर दोन मोठ्या घरांच्या मधोमध बांधले गेले आहे. समोरून पाहिल्यास त्याला खिडक्या आहेत, वाऱ्याच्या खेळत्या हवा येण्यासाठी खिडक्या ठेवण्यात आल्या आहेत. तळमजल्यावर एक छोटंसं दुकान आहे आणि वर जाण्यासाठी अरुंद पायऱ्याही आहेत. विशेष म्हणजे, हे घर तीन मजली आहे, पण केवळ तीन फूट रुंद असल्याने अनेकांना प्रश्न पडला आहे की, अशा घरात राहणे कसे शक्य आहे?
advertisement
advertisement
व्हिडिओवर कोट्यवधी व्ह्यूज, लाखोंनी दिली पसंती
हा व्हिडिओ @smart_amroha या इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे – ‘जगातील सर्वात लहान घर! अवघे तीन फूट रुंद, कधी पाहिले आहे असे घर?’ या व्हिडिओला अवघ्या चार दिवसांतच 3 लाख 19 हजारांहून अधिक लाइक्स आणि 9 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
advertisement
- एका युजरने लिहिले – ‘पुढच्या व्हिडिओत आतून दाखवा, खूप कुतूहल वाटतेय!’
- दुसऱ्याने कमेंट केली – ‘हा व्हिडिओ पाहूनच मला गुदमरल्यासारखे वाटत आहे!’
- तिसऱ्याने लिहिले – ‘हे घर जबरदस्तीने बांधले आहे असे वाटते!’
- चौथ्याने गंमतीने लिहिले – ‘बाजूच्या घरांनी दाबून ते आणखी छोटे केले आहे असे दिसते!’
हे ही वाचा : होय हे शक्य आहे! 2 पुरूष एकत्र येऊन जन्माला घालू शकतात मूल, चीनच्या वैज्ञानिकांचा प्रयोग यशस्वी
advertisement
हे ही वाचा : पोरीला लिप स्टड हवं होतं, फक्त 700 रुपयांत विकले 1 कोटींचे दागिने, आईनं गाठलं पोलीस ठाणं, पुढे काय झालं?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 07, 2025 7:01 PM IST
मराठी बातम्या/Viral/
फक्त 3 फूटांत 3 मजली घर! देशी कारागिरांनी उभं केलं सर्वांत छोटं घर, VIDEO पाहून नेटकरी चकित