Video : शांत गल्ली कोपऱ्यात उभी तरुणी; पाहताच 'अंकल'चा सुटला ताबा, गुलाबी कारनामा सोशल मीडियावर व्हायरल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सध्या एक असा व्हिडीओ समोर आलाय, जो पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता तुम्हाला देखील या व्हिडीओबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असेल. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
मुंबई : खरंतर सोशल मीडियाचा जमाना आलाय आणि इथे दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही हसवणारे, काही धक्का देणारे, तर काही अगदीच विचित्र असे व्हिडीओ इथे दररोज अपलोड किंवा शेअर केले जातात. तर काही व्हिडीओ हे असे असतात जे त्याच्या वेगळेपणामुळे चर्चेत येतात.
पण सध्या एक असा व्हिडीओ समोर आलाय, जो पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता तुम्हाला देखील या व्हिडीओबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असेल. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
हा व्हिडीओ आहे एका तरुणीचा आणि एका 'अंकल'चा म्हणजे अंदाजे 45 वयाचे मध्यमवयीन गृहस्थ जे गल्लीत एका तरुणीसोबत रोमान्स करताना दिसले. हेच कोणीतरी आपल्या कॅमरात रेकॉर्ड केलं आणि सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ शेअर केला.
advertisement
व्हिडीओमध्ये एक तरुण मुलगी शांत गल्लीत एका स्कूटीजवळ उभी आहे. ती कोणाची तरी वाट पाहतेय. इतक्यात एक 'अंकल' तिथं येतात आणि थेट आल्यावर तिला मिठी मारतात. पुढे तर त्यांनी तिला उचलून स्कूटीवर बसवलं. मग काय, प्रेमाचा सीन सुरू! अंकल गुडघ्यावर बसतात, तिचा हात हातात घेतात, काहीतरी कबुली-वबुली देतात. मुलगीही त्यांना उठायला सांगते आणि पुन्हा एकदा मिठी मारते.
advertisement
हे सगळं इतकं रंगात आलं होतं की त्यांना आजूबाजूचं काहीच भान नव्हतं. पण या गल्लीतल्या एका घराच्या बाल्कनीतून कुणीतरी हे सगळं पाहात होतं. आधी तो फक्त बघत होता, पण जेव्हा प्रेमाचं नाट्य काहीसं ओवरडोस झालं, तेव्हा थेट त्याने वरून पाणी फेकलं.
इन बुड्डो को संबलो कोई....😂😂https://t.co/lyYAQPaDDZ
— Bittu (@bBittu46) March 20, 2025
advertisement
पाणी अंगावर पडताच अंकल आणि ती मुलगी दचकतात, वर बघतात आणि त्यांना लक्षात येतं की कुणीतरी त्यांचा व्हिडीओ शूट करतंय! मग काय घाईघाईनं दोघंही स्कूटीवर बसून तिथून पसार होतात.
हा व्हिडीओ नक्की कुठेचा आहे हे समजलेलं नाही, पण ट्विटरवर @Secret_Trader7 या अकाउंटवरून तो शेअर करण्यात आलाय. आतापर्यंत तब्बल या व्हिडीओला लाखो व्हूयज आले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर भारीच गाजतोय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 10, 2025 8:51 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Video : शांत गल्ली कोपऱ्यात उभी तरुणी; पाहताच 'अंकल'चा सुटला ताबा, गुलाबी कारनामा सोशल मीडियावर व्हायरल