Jija Sali Video : साली शेर तर जिजू सव्वा शेर! वरमालावेळी तरुणीला दिलं असं गिफ्ट, पाहून तुम्ही ही म्हणाल, 'ये क्या था?'
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Jija Sali Video : सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही, पण लग्नसराईचे विनोदी किस्से तर कायमच लोकांच्या पसंतीस उतरतात. असाच एक धमाल प्रकार सध्या सोशल मीडियावर गाजतोय आणि लोक अक्षरशः हसून लोटपोट होत आहेत.
मुंबई : सोशल मीडिया हल्ली लोकांसाठी मनोरंजनाचं साधन बनलं आहे. लोक आपल्याला कंटाळा येईल तेव्हा फोन हातात घेऊन बसतात आणि आपल्याला काय पाहिजे ते फोनवर पाहातात. मित्रांना रिल्स व्हिडीओ शेअर करतात आणि आपल्या आयुष्यात काय चाललंय याबद्दल पोस्ट करत असतात. Instagram, Facebook, YouTube यासारख्या अनेक ऍप्स लोकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे लोकांचा तासनतास वेळ इथेच जातो. हे व्हिडीओ लोकांना हसवतात, माहिती देताता आणि काहीतरी करण्यासाठी मोटिवेशन देखील देतात.
सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही, पण लग्नसराईचे विनोदी किस्से तर कायमच लोकांच्या पसंतीस उतरतात. असाच एक धमाल प्रकार सध्या सोशल मीडियावर गाजतोय आणि लोक अक्षरशः हसून लोटपोट होत आहेत.
सध्या व्हायरल होणारा हा व्हिडिओ एका लग्नसमारंभातील आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की वर आणि त्याच्या महुण्या स्टेजवर उभ्या आहेत. त्यात एक मेहुणी नवरदेवाच्या अगदी समोर उभी आहे. नवरदेवाच्या हातात काहीतरी गिफ्ट असल्याचं देखील जिसत आहे. नवरदेव ते गिफ्ट अगदी सावधपणाने उघडत आहे. मेहुणीही त्या गिफ्टकडे उत्सुकतेने पाहात आहे. तिला अपेक्षा आहे की तिचा भावोजी तिला कोणतं तरी महागडं गिफ्ट देणार आहे. पण गिफ्टमधुन जे बाहेर पडलं ते मेहुणीला महागात नक्कीच पडलं, हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहून लक्षात येईल.
advertisement
नवरदेव जसा गिफ्ट बॉक्स उघडतो, तसं त्यातून एक जिवंत बेडूक उडी मारून थेट मेहुणीच्या दिशेनं झेप घेतो आणि तिच्या अंगावर उडी मारतो. हे पाहून मेहुणी घाबरते आणि धक्याने खाली बसते. असा अचानक जिवंत बेडुक तिच्यासमोर येईल याचा तिने स्वप्नात देखील विचार केला नसावा. पाहताना हा प्रसंग फारच मजेशीर वाटतो पण त्या मेहुणीबरोबर काय घडलं असेल हे तिचं तिलाच माहित.
advertisement
हा व्हिडिओ Instagram वर @chillychuckler या युजरने शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलंय, "कसे कसे लोक असतात यार…" हा व्हिडिओ काही तासांतच हजारो लोकांनी पाहिला आणि लाईक्स कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला.
advertisement
एका युजरने लिहिलं "बस कर भाई, बिचारी घाबरली रे!" तर काहींनी हसणाऱ्या इमोजींसह मजेशीर कमेंट्स केल्या. काही लोकांनी गिफ्टमध्ये काय होतं यावर अंदाज लावला, तर एका युजरने स्पष्ट केलं की "गिफ्टमध्ये बेडुकच होता."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 13, 2025 8:48 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Jija Sali Video : साली शेर तर जिजू सव्वा शेर! वरमालावेळी तरुणीला दिलं असं गिफ्ट, पाहून तुम्ही ही म्हणाल, 'ये क्या था?'