Maha Kumbh Mela 2025 : किती प्रकारचे असतात कुंभमेळा? अर्ध, पूर्ण आणि महा कुंभमध्ये फरक काय?

Last Updated:

यावेळी महाकुंभात देश-विदेशातील ४० कोटींहून अधिक लोक सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. 2019 मध्ये प्रयागराज येथे शेवटचा अर्धकुंभ मेळा पार पडला होता.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : पुढच्या वर्षी म्हणजे 2025 ला प्रयागराजमध्ये महाकुंभ 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे. हे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत गंगा आणि यमुनेच्या संगमाववर आयोजीत केले जाणार आहे. महाकुंभ हा भारतात साजरा होणारा सोहळा असला तरी तो जगभरात ओळखला जातो आणि तो जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे. ४५ दिवस चालणारा हा महाकुंभ हिंदूंसाठी खूप महत्त्वाचा आहे. या कालावधीत एकूण सहा शाही स्नान होणार आहे.
यावेळी महाकुंभात देश-विदेशातील ४० कोटींहून अधिक लोक सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. 2019 मध्ये प्रयागराज येथे शेवटचा अर्धकुंभ मेळा पार पडला होता. तर यापूर्वी २०१३ मध्ये प्रयागराजमध्ये महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. तर हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
वास्तविक, कुंभमेळ्याचे चार प्रकार आहेत - कुंभ, अर्ध कुंभ, पूर्ण कुंभ आणि महाकुंभ. सर्व कुंभमेळे ग्रहांच्या स्थितीनुसार आयोजित केले जातात. कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी वर्षातील वेळही खूप महत्त्वाची असते. प्रत्येक कुंभमेळ्याचे स्वतःचे वेगळे महत्त्व असते.
advertisement
प्रयागराजशिवाय हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथेही कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हा मेळा 12 वर्षांच्या अंतराने साजरा केला जातो. त्यासाठी चारही जागा एक-एक करून निवडल्या जातात. या वेळी भक्त गंगा, क्षिप्रा, गोदावरी आणि संगम (तीन नद्यांचे मिलनस्थान) स्नान करतात.
अर्ध कुंभ, पूर्ण कुंभ आणि महाकुंभचं महत्व समजून घेऊ.
अर्ध कुंभ
कुंभमेळ्याच्या विपरीत, अर्धकुंभ हा दर सहा वर्षांनी साजरा केला जातो. अर्धकुंभचे आयोजन प्रयागराज आणि हरिद्वार या दोनच ठिकाणी केले जाते. अर्धा कुंभेळा असल्यामुळे सहा वर्षांनी त्याचे आयोजन केले जाते.
advertisement
पूर्ण कुंभ
12 वर्षांनंतर साजरा होणाऱ्या कुंभमेळ्याला पूर्ण कुंभमेळा म्हणतात. पूर्ण कुंभ फक्त प्रयागराजमधील संगम किनारी आयोजित केला जातो.  प्रयागराजमध्ये होणारा कुंभ अत्यंत शुभ मानला जातो.
महाकुंभ
हा दर 144 वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्याला महाकुंभ म्हणतात. हे फक्त प्रयागराजमध्ये आयोजित केले जाते. कारण हा कुंभमेळा अनेक वर्षांनी येतो त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. १२ पूर्ण कुंभानंतर महाकुंभ होतो.
advertisement
असे म्हणतात की समुद्रमंथनाच्या वेळी अमृत पिण्यासाठी देव आणि दानवांमध्ये 12 दिवस सतत युद्ध झाले. विशेष म्हणजे हे 12 दिवस मानवासाठी 12 वर्षांचे असतात, त्यामुळे कुंभ देखील बारा वर्षांचा असतो. यापैकी चार कुंभ पृथ्वीवर आणि आठ कुंभ स्वर्गात आहेत. युद्धादरम्यान, शनि, चंद्र आणि सूर्य या देवतांनी कलशाचे रक्षण केले. त्या काळापासून जेव्हा वर्तमान राशींचे रक्षण करणारे ग्रह येतात तेव्हा कुंभ राशीचे शुभयोग तयार होतात.
मराठी बातम्या/Viral/
Maha Kumbh Mela 2025 : किती प्रकारचे असतात कुंभमेळा? अर्ध, पूर्ण आणि महा कुंभमध्ये फरक काय?
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement