Viral News : 50 वर्षांपासून महिलेनं अन्न खालं नाही, वासानेच होते उलटी; नेमकं प्रकरण काय?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
एका महिलेनं दावा केला आहे की, तिनं गेल्या 50 वर्षात कोणतंही अन्न खाल्लं नाही. हे वाचूनच कोणाला विश्वास बसणार नाही. मग महिलेनं असा दावा का केला? हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
नवी दिल्ली, 5 डिसेंबर : अन्न, पाणी, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत, ज्यांच्याशिवाय कोणताही व्यक्ती राहू शकत नाही. माणसाला जगण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. मात्र कोणी यापैकी कोणत्याही गोष्टीपासून जास्त दिवस दूर राहू शकत नाही. सध्या एका महिलेनं दावा केला आहे की, तिनं गेल्या 50 वर्षात कोणतंही अन्न खाल्लं नाही. हे वाचूनच कोणाला विश्वास बसणार नाही. मग महिलेनं असा दावा का केला? हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
सोशल मीडियावर एक महिला सध्या चर्चेत आहे. गेली अनेक वर्ष तिनं काहीच खाल्लं नसल्याचा दावा केला आहे. तिचं म्हणणं आहे, ती फक्त पाण्यावर जगते. किंवा कुठल्याही ड्रिंकवर. महिला 75 वर्षाची असून व्हिएतनाममध्ये राहते.
75 वर्षीय या महिलेचं नाव बुई थी लोई आहे . ती व्हिएतनामच्या क्वांग बिन्ह प्रांतातील लोक निन्ह कम्यूनमध्ये राहते. ती तिच्या वयानुसार खूप चांगली आणि तरुण दिसते. या वृद्ध महिलेचं म्हणणं आहे की ती 50 वर्षापासून पाणी आणि शीतपेयांवर जगत आहे, तिला कधीही काही खाण्याच्या पदार्थाची इच्छा नसते.
advertisement
ऑडिटी सेंट्रलच्या अहवालानुसार, लोई म्हणतात की हे सर्व 1963 मध्ये सुरू झालं जेव्हा ती आणि इतर महिला युद्धादरम्यान जखमी सैनिकांवर उपचार करण्यासाठी पर्वतावर चढत होत्या. त्यानंतर तिच्यावर वीज पडली, त्यामुळे ती बेशुद्ध झाली, पण तिचा जीव वाचला, मात्र त्यानंतर ती पहिल्यासारखी राहिली नाही. शुद्धीवर आल्यानंतर बरेच दिवस तिनं काहीही खाल्लं नाही. अशा स्थितीत तिचे मित्र तिला गोड पाणी देऊ लागले. तिच्या मित्रांच्या वारंवार विनंतीवरून, तिनं फळांसह काहीतरी खाण्यास सुरुवात केली, परंतु काही वर्षांनी 1970 मध्ये तिनं कायमचं खाणं सोडलं.
advertisement
दरम्यान, आता लोईचा फ्रीज फक्त पाण्याच्या बाटल्या आणि गोड थंड ज्यूसने भरला आहे. लोईचा दावा आहे की, अन्नाच्या फक्त वासामुळे तिला मळमळ होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 05, 2023 7:32 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Viral News : 50 वर्षांपासून महिलेनं अन्न खालं नाही, वासानेच होते उलटी; नेमकं प्रकरण काय?