100 शेळ्या पाळा अन् सरकारकडून 8 लाख रुपये मिळवा! पात्रता,अर्जप्रक्रिया A TO Z माहिती

Last Updated:

National Livestock Mission : शेतीसह पशुपालन हा एक विश्वासार्ह पर्याय ठरत असून ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीचा एक प्रभावी मार्ग बनतोय. यामध्ये शेळीपालन हा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

agriculture news
agriculture news
मुंबई : शेतीसह पशुपालन हा एक विश्वासार्ह पर्याय ठरत असून ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीचा एक प्रभावी मार्ग बनतोय. यामध्ये शेळीपालन हा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. कमी खर्च, जलद नफा आणि दूध, मांस, लोकर यांना बाजारपेठेत वाढती मागणी यामुळे हा व्यवसाय अनेक शेतकऱ्यांना आकर्षित करतो. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियान (National Livestock Mission - NLM) योजनेअंतर्गत आता 100 शेळ्यांच्या युनिटसाठी तब्बल 15 लाख रुपयांपर्यंतची सबसिडी मिळू शकते.
काय आहे NLM योजना?
NLM योजना ही 2014-15 साली सुरू झालेली केंद्र सरकारची उपक्रमशील योजना असून 2021-22 मध्ये तिच्यात सुधारणा करून ती आणखी परिणामकारक करण्यात आली. योजनेचा उद्देश ग्रामीण तरुण, शेतकरी, स्वयंसहायता गट (SHG), सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), संयुक्त दायित्व गट (JLG) यांना पशुपालनावर आधारित उद्योजकता विकसित करणे हा आहे.
advertisement
ही योजना केवळ शेळीपालनापुरती मर्यादित नसून, मेंढी, डुक्कर, कुक्कुटपालन, चारा उत्पादन, पशुखाद्य युनिट, शेड बांधणी, सायलेज मशिनरी इत्यादींसाठी देखील लाभ देण्यात येतो.
शेळीपालन युनिटसाठी किती आणि कशी मिळते सबसिडी?
जर एखाद्या अर्जदाराने 100 शेळ्या आणि 5 बोकडांच्या युनिटसाठी प्रकल्प तयार केला, तर सुमारे 15 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असतो. यावर 50% म्हणजे 7.5 लाख रुपये सबसिडी मिळते. ही सबसिडी दोन टप्प्यांमध्ये दिली जाते. पहिला हप्ता प्रकल्प सुरू केल्यानंतर तर दुसरा हप्ता प्रकल्प पूर्ण झाल्यावर मिळतो.
advertisement
कोण अर्ज करू शकतो?
भारतीय नागरिक, ग्रामीण भागात रहिवासी
व्यक्ती, SHG, FPO, JLG किंवा सहकारी संस्था
पशुपालनाचा अनुभव किंवा अधिकृत प्रशिक्षण आवश्यक
प्रकल्पासाठी बँकेकडून कर्ज मंजूर असणे किंवा स्वतःचा निधी दाखवणे. जर प्रशिक्षण नसेल, तर अनुभवी पशुवैद्यक किंवा संस्थेची मदत घेणे शक्य आहे.
अर्ज प्रक्रिया कशी करावी?
सर्वात आधी www.nlm.udyamimitra.in या अधिकृत पोर्टलवर भेट द्या.मोबाईल नंबरद्वारे OTP आधारित नोंदणी करा.
advertisement
अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
आधार कार्ड, पॅन कार्ड, KYC डॉक्युमेंट
बँकेचं कर्ज मंजुरी पत्र
प्रकल्प अहवाल (Project Report)
प्रशिक्षण प्रमाणपत्र (जर उपलब्ध असेल तर)
जमिनीचे दस्तऐवज (मालकी/भाडे)
तसेच अर्जाचे स्टेटस तुम्ही पोर्टलवर थेट तपासू शकता.राज्यस्तरीय कार्यकारी समिती आणि केंद्रीय पशुसंवर्धन विभाग अर्जाची छाननी करतात.
शेळीपालनासाठी आवश्यक बाबी कोणत्या?
चांगल्या प्रतीच्या शेळ्यांची निवड करणे. जसे की, बोअर, उस्मानाबादी, सिरोही, जामुनापरी जाती फायदेशीरहवेशीर,स्वच्छ शेडची व्यवस्था. चाऱ्याची सतत उपलब्धता करणे. लसीकरण, आरोग्य तपासणी आणि विमा कवच काढणे.
advertisement
दरम्यान, NLM योजना ही ग्रामीण उद्योजकतेला चालना देणारी आणि शेतीपूरक उत्पन्न वाढवणारी प्रभावी योजना ठरत आहे. योग्य नियोजन आणि मार्गदर्शन घेतल्यास, शेळीपालनातून लाखोंचा नफा मिळवणं शक्य आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
100 शेळ्या पाळा अन् सरकारकडून 8 लाख रुपये मिळवा! पात्रता,अर्जप्रक्रिया A TO Z माहिती
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement