ट्रॅक्टर खरेदीसाठी लोन कसं काढायचं? सरकारी की खाजगी बँक योग्य? A TO Z माहिती

Last Updated:

Tractor News : शेतीसाठी ट्रॅक्टर हे अत्यंत महत्त्वाचे साधन मानले जाते. मात्र नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक आवश्यक असते.

Tractor News
Tractor News
मुंबई : शेतीसाठी ट्रॅक्टर हे अत्यंत महत्त्वाचे साधन मानले जाते. मात्र नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक आवश्यक असते. बहुतेक शेतकऱ्यांकडे एवढी मोठी रक्कम एकत्र करणे शक्य नसल्याने त्यांना बँक किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणे भाग पडते. आज आपण ट्रॅक्टर कर्जाची पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि कोणत्या बँकेकडून कर्ज घ्यावे याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
ट्रॅक्टर कर्ज कुठून मिळते?
सध्या सरकारी बँका, खाजगी बँका तसेच एनबीएफसी (नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या) ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून देतात. तुम्ही ज्या कंपनीकडून ट्रॅक्टर खरेदी करता, त्याच कंपनीच्या डीलरशिपवर बँका आणि एनबीएफसीचे एजंट उपलब्ध असतात. ते शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज मिळवून देण्यास मदत करतात. साधारणपणे ट्रॅक्टर कर्जावरील व्याजदर ९ टक्क्यांच्या आसपास असतो. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सर्वात कमी म्हणजे ९ टक्के व्याजदराने ट्रॅक्टर कर्ज देते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नेहमी कमी व्याजदर देणाऱ्या बँकेकडूनच कर्ज घेणे फायदेशीर ठरते.
advertisement
सरकारी बँका की खाजगी बँका?
शेतकरी सर्वसाधारणपणे सरकारी बँकांकडून कर्ज घेण्याला प्राधान्य देतात कारण त्या बँका तुलनेने कमी व्याजदर आकारतात. मात्र, सरकारी बँकांची कर्ज देण्याची प्रक्रिया काहीशी गुंतागुंतीची असते. कागदपत्रांमध्ये किंवा पात्रतेमध्ये थोडीशीही त्रुटी असल्यास कर्ज मंजुरीस विलंब होऊ शकतो किंवा कर्ज नाकारले जाऊ शकते. दुसरीकडे, खाजगी बँका तुलनेने सोपी आणि जलद प्रक्रिया करतात. त्यामुळे कर्ज पटकन मिळते, परंतु त्यांच्या व्याजदर थोडे जास्त असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या सोयी, पात्रता आणि खर्च लक्षात घेऊन निर्णय घ्यावा.
advertisement
ट्रॅक्टर कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
पत्त्याचा पुरावा (वीज बिल, राशन कार्ड इ.)
उत्पन्नाचा दाखला
बँक खात्याचे पासबुक
जमिनीच्या मालकीचा दाखला
२ पासपोर्ट आकाराचे फोटो
आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक
जमाबंदी पावती
ट्रॅक्टर कर्जासाठी पात्रता काय?
अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असावे.
अर्जदाराच्या नावावर किमान २ ते ३ एकर शेतीची जमीन असावी.
advertisement
जमिनीचा मालकी हक्क अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचा CIBIL स्कोअर चांगला असावा, कारण तो कर्ज मंजुरीसाठी महत्त्वाचा घटक ठरतो.
मराठी बातम्या/कृषी/
ट्रॅक्टर खरेदीसाठी लोन कसं काढायचं? सरकारी की खाजगी बँक योग्य? A TO Z माहिती
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement