Crop Insurance : राज्यात पिक विमा योजना बंद होणार? कृषी मंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Crop Insurance : पिक विमा योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे बळीराजा संभ्रमात होता. या मुद्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
संजय शेंडे, प्रतिनिधी, अमरावती: राज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी अवघ्या 1 रुपयांमध्ये पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून पिक विमा योजनेबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. पिक विमा योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे बळीराजा संभ्रमात होता. या मुद्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी पिक विम्यातील घोटाळ्याबाबत भाष्य केले.
पिक विम्याबाबत माणिकराव काय म्हणाले?
पिक विम्यात गैरप्रकार होत असल्याचे समोर आले होते. पिक विमा घोटाळ्याच्या परिणामी ही योजनाच बंद होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, या चर्चा कृषी मंत्र्यांनी फेटाळून लावल्या. माणिकराव कोकाटे यांनी म्हटले की, सरकारला पिक विमा योजना बंद करायची नाही. परंतु या योजनेत होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावे लागेल काही निर्णय घ्यावे लागतील असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. जो काही निर्णय घ्यावा लागेल त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सोबत बसून चर्चा करून निर्णय घेतला जाईल. परंतु पिक विमा योजना ही बंद होणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
advertisement
पिक विमा योजनेची पुनर्रचना होणार?
पिक विमा योजनेची पुनर्रचना होणार असल्याचे संकेत माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटले की या विमा योजनेमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. कशामुळं काही लोक गैरफायदा घेतात कंपन्या देखील लूटमार करतात. त्यामुळे निकष बदलले जाणार असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले. अल्पभूधारक शेतकऱ्याला एक रुपयात विमा आणि इतर शेतकऱ्यांना शंभर रुपये विमा असा निर्णय घेता येणार नाही. एक वेळी पिकाप्रमाणे विमा आकारता येईल परंतु एकाला शंभर रुपयात आणि एकाला एक रुपयात विमा देता येणार नाही हे देखील माणिकराव कोकाटे असेही त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
इतर संबंधित बातमी :
view comments
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
February 14, 2025 3:05 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Crop Insurance : राज्यात पिक विमा योजना बंद होणार? कृषी मंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट...


