PM Kisan Yojana : मोठी अपडेट! 'या' शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून एकाचवेळी 18000 मिळणार

Last Updated:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान अंतर्गत लाखो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.आता पीएम किसान योजनेतून एकाचवेळी शेतकऱ्यांना 18 हजार रूपये मिळणार आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana
PM Kisan Samman Nidhi Yojana
PM Kisan Samman Nidhi Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान अंतर्गत लाखो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.आता पीएम किसान योजनेतून एकाचवेळी शेतकऱ्यांना 18 हजार रूपये मिळणार आहे. पण ही रक्कम काही ठरावीक शेतकऱ्यांनाचा मिळणार आहे. हे शेतकरी नेमके कोण असणार आहेत? हे जाणून घेऊयात.
ज्या शेतकऱ्यांना 11व्या हप्त्यानंतरचे पैसे मिळणे बंद झाले आहेत.अशा शेतकऱ्यांना सरकारने पुन्हा एक संधी दिली आहे.यावर केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पुन्हा पडताळणी केल्यास, त्यांना 12व्या हप्त्यापासून 20व्या हप्त्यापर्यंतची संपूर्ण रक्कम म्हणजेच 18,000 रुपये एकाचवेळी बँक खात्यात जमा होऊ शकतात.
विशेष म्हणजे या गोष्टीचा लाभ त्या शेतकऱ्यांना होणार आहे,ज्या शेतकऱ्यांना 11व्या हप्त्यानंतरचे पैसे मिळणे बंद झाले आहेत.त्यामुळे या शेतकऱ्यांना सरकारने पुन्हा संधी देऊन मोठा दिलासा दिला आहे.
advertisement
खरं तर सरकारने पीएम किसान योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी काही बदल केले होते. जसे ई केवायसी,आधार सिडींग, जमीन नोंदणी लिंक करणे, आधार आधारीत पेमेंट सिस्टीमचा यामध्ये समावेश होता. शेतकऱ्यांनी हे नियम न पाळल्यामुळे त्यांचे हप्ते थांबवण्यात आले होते.
जसं पीएम किसानच्या 12 व्या हफ्त्यासाठी जमीन नोंदणी लिंक करणे आवश्यक होते.13व्या हफ्त्या दरम्यान आधार पेमेट सिस्टम लागू झाली. 15 व्या हफ्त्या दरम्यान ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले होते. या नियमांमुळे काही राज्यातील शेतकऱ्यांचे हफ्ते थकले होते. कारण कागदपत्रांची पडताळणी करण्यास उशीर झाला होता. पण आता त्या शेतकऱ्यांना पुन्हा संधी मिळाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
advertisement
आता जर तुम्ही या अटी पूर्ण केल्या तर सर्व प्रलंबित हप्ते एकरकमी मिळू शकतात. कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर म्हणाले की, जे शेतकरी आता कागदपत्रे पूर्ण करतील त्यांना 12 व्या ते 20 व्या हप्त्यापर्यंत म्हणजेच 18,000 रुपये एकत्रित रक्कम मिळू शकते. यासाठी तुम्हाला काही सोप्या पायऱ्या कराव्या लागतील. प्रथम पीएम-किसान पोर्टलवर लॉगिन करा. नंतर ई-केवायसी पूर्ण करा. तुमचा आधार क्रमांक आणि बँक खाते लिंक करण्याची पुष्टी करा. तसेच, तुमच्या राज्यातील जमिनीच्या नोंदी अपडेट करा आणि रेशन कार्ड सारखी इतर ओळखपत्रे पडताळून घ्या. हे सर्व पायऱ्या सोप्या आहेत आणि त्या लवकर पूर्ण केल्याने तुमची प्रलंबित रक्कम खात्यात येऊ शकते.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
PM Kisan Yojana : मोठी अपडेट! 'या' शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून एकाचवेळी 18000 मिळणार
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement