अमेरिकेसह जागतिक बाजारपेठेत उडाली खळबळ, भारतानं तांदळाबाबत घेतला मोठा निर्णय!
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Rice Exports : भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश म्हणून ओळखला जातो. दरवर्षी भारतातून लाखो टन तांदूळ जगभरात निर्यात केला जातो आणि अनेक देश भारतीय तांदळावर अवलंबून आहेत.
मुंबई : भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश म्हणून ओळखला जातो. दरवर्षी भारतातून लाखो टन तांदूळ जगभरात निर्यात केला जातो आणि अनेक देश भारतीय तांदळावर अवलंबून आहेत. मात्र, देशांतर्गत अन्न सुरक्षेला प्राधान्य देत सरकारने तांदूळ निर्यातीवरील नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भारताचा तांदूळ व्यापार एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे.
advertisement
गेल्या आर्थिक वर्षात 2024-25 दरम्यान भारताने 20.1 दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला. ज्याची किंमत अंदाजे 12.95 अब्ज डॉलर होती. ही आकडेवारी जागतिक तांदळाच्या बाजारात भारताचे वर्चस्व किती मोठे आहे, हे स्पष्ट करते. परंतु देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने निर्यात नियमांमध्ये केलेले बदल जागतिक पातळीवरही मोठा परिणाम घडवून आणत आहेत.
advertisement
अन्न सुरक्षा नियम कडक करण्याची गरज का पडली?
हवामानातील अनियमितता, उष्णतेच्या लाटा, अनिश्चित पावसाळा आणि वाढत्या वापरामुळे देशातील तांदूळ उत्पादनावर दडपण आले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत (NFSA) देशातील 800 दशलक्ष लोकांना अनुदानित धान्य पुरवले जाते. त्यामुळे पुरेसा साठा राखणे ही सरकारची महत्त्वाची जबाबदारी आहे. हीच कारणे लक्षात घेऊन सरकारने काही महत्त्वाचे पावले उचलली आहेत.
advertisement
बिगर-बासमती तांदूळ निर्यातीवर बंदी,निर्यातीसाठी किमान निर्यात किंमत (MEP) निश्चित करणे सीमाशुल्क तपासणी अधिक कडक करणे. यामुळे देशांतर्गत तांदळाची उपलब्धता वाढून किमती नियंत्रणात राहतील, असा सरकारचा उद्देश आहे.
advertisement
निर्यातदारांसाठी वाढत्या अडचणी
सरकारच्या कठोर धोरणांमुळे निर्यातदारांसाठी मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. निर्यातीसंबंधित धोरणे कधी खुली, कधी मर्यादित, तर कधी पूर्णपणे बंद होतात, ज्यामुळे नियोजन करणे कठीण बनले आहे.
advertisement
याशिवाय कागदपत्रांची पडताळणी आणि प्रक्रिया आणखी कठोर झाली आहे. शिपमेंटमध्ये होणाऱ्या विलंबामुळे साठवणूक खर्च वाढत आहे. MEP मुळे भारतीय तांदूळ आंतरराष्ट्रीय बाजारात तुलनेने महाग ठरत आहे.लहान-मोठ्या निर्यातदारांना मोठा फटका बसत आहे
जागतिक तांदूळ बाजारातील उलथापालथ
advertisement
भारत हे अनेक देशांसाठी प्रमुख तांदूळ पुरवठादार आहे. त्यामुळे भारतीय निर्यातीवरील निर्बंधांचा थेट परिणाम जागतिक बाजारावर होत आहे. पश्चिम आफ्रिका, मध्य पूर्व, आग्नेय आशिया येथील देश भारतीय तांदळावर अवलंबून असल्याने पर्यायी देशांकडून पुरवठा घेण्यास त्यांना भाग पडले आहे. भारतीय तांदूळ उपलब्ध नसल्याने अनेक देश खालील पुरवठादारांकडे वळत आहेत. जसे की, थायलंड, व्हिएतनाम, म्यानमार, पाकिस्तान. जरी या देशांतील तांदूळ किंमतीने महाग असला, तरी स्थिर पुरवठ्यासाठी जागतिक खरेदीदार हे पर्याय स्वीकारत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2025 1:54 PM IST


