....अन्यथा तुमच्या गावाकडील घर, बंगल्यावर होणार बुलडोझर कारवाई! नियम काय सांगतो?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture Law : गावाकडच्या हिरवाईने नटलेल्या परिसरात स्वतःच्या शेतात छोटेसे घर असावे, असा अनेकांचा विचार असतो.
मुंबई : गावाकडच्या हिरवाईने नटलेल्या परिसरात स्वतःच्या शेतात छोटेसे घर असावे, असा अनेकांचा विचार असतो. निसर्गरम्य वातावरण, स्वच्छ हवा आणि शांत जीवनशैली अनुभवण्याची इच्छा असली तरी शेतजमिनीवर थेट घर बांधणे कायदेशीरदृष्ट्या परवानगीशिवाय शक्य नाही. त्याबद्दलचे काही नियम अटी आहेत. तेच आपण जाणून घेणार आहोत.
शेतजमिनीवर घर बांधणे कायदेशीर आहे का?
सध्याच्या कायद्यांनुसार शेतजमीन ही केवळ शेतीसाठी राखीव असते. त्यामुळे कोणतेही घर, दुकान किंवा व्यावसायिक बांधकाम करण्यासाठी ‘बिगरशेती (Non-Agricultural – NA) परवानगी’ घेणे बंधनकारक आहे. जर परवानगीशिवाय शेतात घर बांधले, तर ग्रामपंचायत, नगर परिषद किंवा जिल्हा प्रशासन संबंधित बांधकामावर कारवाई करून ते पाडू शकते. अशावेळी मोठे आर्थिक नुकसान आणि कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी योग्य प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे.
advertisement
शेतात घर बांधण्यासाठी आवश्यक परवानग्या
शेतजमिनीवर कायदेशीर बांधकाम करण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागते. जसे की, NA परवानगी (Non-Agricultural Conversion) तहसील कार्यालय जमिनीची तपासणी करून अहवाल सादर करते. सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर जिल्हाधिकारी NA प्रमाणपत्र जारी करतात.
बांधकाम परवानगी
NA प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अधिकृत आर्किटेक्टकडून बांधकाम आराखडा तयार करून तो ग्रामपंचायत किंवा नगरपरिषदेकडून मंजूर करून घ्यावा.
advertisement
विकास परवानगी
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 नुसार ही परवानगी आवश्यक आहे. Building Plan Management System (BPMS) या ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज करता येतो.
आवश्यक कागदपत्रांची यादी
जमीन मालकाचे ओळखपत्र (आधार, पॅन कार्ड)
सातबारा आणि फेरफार उतारा
पिकांची व जमिनीच्या वापराची नोंद
महसूल पावत्या (कर भरणा प्रमाणपत्र)
जमिनीचा सर्व्हे नकाशा व लेआउट प्लॅन
advertisement
कोणताही वाद किंवा थकबाकी नसल्याचा दाखला
वरील सर्व अटी पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून NA प्रमाणपत्र मिळते, ज्यामुळे बांधकाम कायदेशीररित्या सुरू करता येते.
शासनाचे नवीन नियम काय?
महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये घेतलेल्या शासन निर्णयानुसार, ‘Building Plan Management System (BPMS)’ लागू करण्यात आले आहे. या प्रणालीमुळे NA आणि विकास परवानग्या ऑनलाइन, पारदर्शक आणि वेगवान पद्धतीने दिल्या जाणार आहेत.
advertisement
नवीन नियमांनुसार, जमीन पूर्णपणे अर्जदाराच्या मालकीची असावी. संबंधित जमीन कोणत्याही सार्वजनिक प्रकल्पासाठी आरक्षित नसावी. FSI आणि बांधकाम नियमांचे काटेकोर पालन आवश्यक आहे. औद्योगिक वा टाऊनशिप बांधकामासाठी विशेष परवानगी लागेल.
काय काळजी घ्यावी?
NA व बांधकाम परवानगीशिवाय कोणतेही बांधकाम करू नये.
जमिनीची कायदेशीर स्थिती, थकबाकी आणि वाद तपासून घ्यावेत.
मंजूर आराखड्यानुसारच काम करावे; अन्यथा परवाना रद्द होऊ शकतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 13, 2025 12:05 PM IST