भेंडी पिकातून उत्पन्न चांगले मिळावे आणि वातावरणाच्या लहरीपणामुळे पिकावर उद्भवणाऱ्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्राइड, कोराझन तसेच धुळी रोगासाठी सल्फर औषधाच्या फवारण्या केल्या जातात. भेंडी शेतीसाठी काही वेळा मजुरांची देखील आवश्यकता असते त्यामुळे त्यांच्या साहाय्याने फवारणी, काढणी केली जाते. पोपळे यांच्या अर्धा एकर शेतात जवळपास 9 हजार भेंडीचे झाडे आहेत, सध्या भेंडीला चांगला भाव देखील आहे त्यामुळे भेंडी उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
advertisement
MBA केलं, नोकरी न करता व्यवसायाला प्राधान्य, तरुणाची वर्षाला 5 लाख कमाई
भेंडी शेतीत आंतरपीक केल्यामुळे भेंडीच्या झाडांमध्ये काही प्रमाणात वाढ देखील झाली आहे. ॲपल बोर, टोमॅटो, भेंडी हे 3 पिके असल्यामुळे सीजननुसार टोमॅटोच्या जागी हिवाळ्यात दोडके, किंवा कारले या पिकाचे देखील उत्पादन घेता येते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने अर्धा किंवा 1 एकर मध्ये भेंडीचे पीक घेतले पाहिजे तसेच भेंडी पीक तीन दिवसांनी उत्पन्न देणारे आहे त्यामुळे इतर शेतकऱ्यांनीही भेंडीची शेती करावी, असे आवाहन देखील पोपळे यांनी केले आहे.