जालना : जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेली सेंद्रिय भेंडी थेट युरोपीय देशांमध्ये विक्री होत आहे. एका मल्टिनॅशनल कंपनीच्या माध्यमातून करार पद्धतीने भेंडीची शेती सिंधी, काळेगाव, धारकल्याण, नंदापूर इत्यादी गावातील शेतकरी करत आहेत. तब्बल 194 शेतकरी या प्रयोगामध्ये सहभागी असून त्यांना 27 रुपये प्रति किलो असा दर शेतावरच दिला जातो. तब्बल 40 क्विंटल भेंडीची युरोपातील जर्मनी, इटली, फ्रान्स, इंग्लंड अशा देशांमध्ये निर्यात केली जाते. एकरी केवळ 15 हजार रुपये खर्च करून शेतकऱ्यांना 2 ते 3 लाखांचं निव्वळ उत्पन्न या माध्यमातून मिळत आहे.
advertisement
मुंबई येथील थ्री सर्कल ऍग्रो एक्सपोर्ट या कंपनीच्या माध्यमातून जर्मनी, इटली, लंडन, फ्रान्स, बांगलादेशसह विविध देशांत भेंडी ट्रान्सपोर्टने पाठवली जाते. करार पद्धतीने भेंडी लागवड केलेल्या एका शेतकऱ्याला चार महिन्यांत एका एकरात 3 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. जालना जिल्ह्यातून 40 क्विंटल भेंडी परदेशात विक्री करण्यात येते.
नोकरी सोबत शेतीत यश, एका एकरामध्ये 2 लाख रुपयांचा नफा, तरुणाने असं काय केलं?
कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रात नऊ जिल्ह्यांत हा प्रयोग राबवला जात आहे. जालन्यात सध्या 194 शेतकऱ्यांनी भेंडीची लागवड केली आहे. कंपनीकडून बियाणे उपलब्ध करून देत, फवारणीही करवून दिली जाते. रोज तोडणी करून भेंडी पॅकिंग करण्यासाठी कंपनीकडून बॉक्स देण्यात येतो. जर्मनी, इटली, लंडन, फ्रान्स, बांगलादेशसह विविध देशांत भेंडीची निर्यात केली जाते, असं कंपनीचे प्रतिनिधी संतोष राठोड यांनी सांगितलं.
ऑक्टोबरमध्ये चार किलो भेंडीची बियाणे 30 एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. भेंडीचा तोडा आता सुरू झाला असून दर तिसऱ्या दिवशी एक ते दीड क्विंटल भेंडीचे उत्पादन मिळत आहे. आतापर्यंत 30 ते 35 क्विंटल भेंडीचे उत्पादन मिळाले आहे. या भेंडीला 27 रुपये प्रति किलो असा जागेवरच दर मिळत आहे. शेतावरच पॅकिंग करून दहा दिवसांनी पैसे मिळतात. 30 गुंठ्यामध्ये साधारणपणे दीड ते 2 लाखांचं उत्पन्न मिळत असल्याचे शेतकरी राम जिरं सांगितलं.





