TRENDING:

मित्राने दिला सल्ला, अंगठाबहाद्दर शेतकऱ्यानं केला अर्ध्या एकरमध्ये दुहेरी प्रयोग, लाखोंचे उत्पन्न

Last Updated:

सध्या शेतकरी प्रयोगशील शेती करत शेतात वेगवेगळे पिके आणि पालेभाज्या घेत आहेत. अशीच एक वेगळी शेती सोलापूर जिल्ह्यातील हराळवाडी गावातील एका अंगठाबहाद्दर शेतकऱ्याने केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
advertisement

सोलापूर : सध्या शेतकरी प्रयोगशील शेती करत शेतात वेगवेगळे पिके आणि पालेभाज्या घेत आहेत. अशीच एक वेगळी शेती सोलापूर जिल्ह्यातील हराळवाडी गावातील एका अंगठाबहाद्दर शेतकऱ्याने केली आहे. अर्ध्या एकरामध्ये त्यांनी घेवडा आणि मुळाची लागवड केली आहे. मुळा विक्रीतून 25 दिवसात त्यांना आतापर्यंत 40 हजार रुपयांचा नफा मिळाला आहे. तर घेवडा विक्रीतून 10 हजार रुपयांचे उत्पन्न त्यांनी घेतले आहे. सध्या मुळा आणि घेवड्याची तोडणी सुरू असून त्यांना यामधून लाखोंचे उत्पन्न मिळणार आहे.

advertisement

हराळवाडी गावातील अंगठाबहाद्दर शेतकरी रंगसिद्ध शेळके यांनी अर्ध्या एकरात मुळा आणि घेवड्याची लागवड केली आहे. कमी दिवसात जास्त उत्पन्न कसं घेता येतं या पद्धतीने रंगसिद्ध शेळके यांनी शेती केली आहे. या आधी रंगसिद्ध शेळके हे ऊसाची शेती करत होते. ऊसाचे बील लवकर मिळत नसल्याने आर्थिक परिस्थिती हालाखीची होत चाललेली होती.

advertisement

वय 20 वर्ष, दोनदा जिंकला तळेगावमधील शंकरपट, रचला 11.96 सेकंदात नवा विक्रम Video

रंगसिद्ध शेळके यांच्या मित्राने मुळा आणि घेवडा लावायचा सल्ला दिला. मित्राने दिलेला सल्ला ऐकून रंगसिद्ध शेळके यांनी एकरात मुळा आणि घेवडा याची लागवड केली. अर्ध्या एकर शेतात मुळा आणि घेवडा लागवडीसाठी शेतकरी रंगसिद्ध यांना 30 हजार रुपये पर्यंत खर्च आला आहे. तर फक्त मुळा विक्रीतून शेतकरी रंगसिद्ध शेळके यांना आतापर्यंत 40 हजार रुपयांचा नफा मिळाला आहे. सध्या शेतात मुळा तोडणी सुरू असून मुळा विक्रीतून शेतकरी रंगसिद्ध शेळके यांना 1 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे काय? शरीराला कसा होतो फायदा? Video
सर्व पहा

तर घेवडा सुद्धा चांगल्या पद्धतीचा शेतात आला असून घेवडा विक्रीतूनही 40 ते 50 हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न शेतकरी रंगसिद्ध शेळके यांना मिळणार आहे. अर्ध्या एकरात रंगसिद्ध यांना एक ते दीड लाखांचे उत्पन्न या शेतीतून मिळणार आहे. रंगसिद्ध शेळके हे शेतातील मुळा स्वतः तोडून बाजारात 10 रुपयेला एक नग याप्रमाणे विक्री करत आहे. शेतकऱ्यांनी जर डोकं लावून शेती केली तर नोकरापेक्षा जास्त उत्पन्न घेऊ शकाल, असा सल्ला अंगठाबहाद्दर शेतकरी रंगसिद्ध शेळके यांनी दिला आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
मित्राने दिला सल्ला, अंगठाबहाद्दर शेतकऱ्यानं केला अर्ध्या एकरमध्ये दुहेरी प्रयोग, लाखोंचे उत्पन्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल