सिंधुदुर्ग : कोकणात नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेला फळांचा राजा म्हणून हापूस आंबा ओळखला जातो. साधारणता ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात आंब्याच्या झाडाची काळजी घेतल्यास आंब्याला जर पोषक वातावरण असेल तर मोहोर येण्यास सुरुवात होते. या वर्षी देखील आंब्याची पहिली पेटी मुबंई, नाशिककडे रवाना झाली. सध्या कोकणातील थंडीचे प्रमाण वाढल्याने आंबा, काजूस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे आंबा मोहर आणि फाळधारणा होण्यास सुरुवात झाली आहे.
advertisement
त्यामुळे यावर्षीचा आंबा हंगाम हा मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सर्व बाजारपेठामध्ये दिसण्याची चिन्ह आहेत. पोषक वातावरण असल्याने या वर्षी आंब्याचे प्रमाण 30 टक्के वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामन्याच्या दरात हा आंबा मार्च महिन्यात बाजारात उपलब्ध होईल असे बागायतदाराचे म्हणणे आहे. त्यामुळे या वर्षीचा आंबा हंगाम हा 90 दिवसाचा असणार आहे आणि आंबा खवंय्यासाठी ही एक मेजवानी असणार आहे.
सुरुवातीस फेंगल वादळचा फटका आंब्याला बसणार होता परंतु झाडाची काळजी आणि मोहराचे संरक्षण केल्याने हा धोका टळला. त्यामुळे काही आंब्याच्या झाडांना कैऱ्या दिसू लागल्या आहेत. हा आंबा साधारणतः फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात बाजारात येऊ शकतो. त्यामुळेच आंबा खवंय्यासाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे. देवगड हापूसची एक चव वेगळीच असल्याने ग्राहक देखील मोठ्या उत्साहाने देवगड हापूस आंबा कधी बाजारात येतो याचीच वाट पाहत असतात.
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजूस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे याचा फायदा आंबा बागायदारांना झाला आहे. निसर्गाच्या बदलत्या वातावरणाचा फटका हा आंबा बगायतीना लगेच बसतो. त्यामुळे त्या झाडाची आणि मोहोरोची, फळांची मोठ्या प्रमाणानात काळजी घ्यावी लागते, यामुळे फवारण्याचा खर्च देखील वाढतो. परंतु या वर्षी देखील सुरुवातीस वातावरणाचा फटका आंब्याला बसला होता परंतु त्यावर मात करत आज मोहोराचे संरक्षण करून हा आंबा मार्च महिन्यात बाजारात येऊ शकतो असे बागायतदारांनी सांगितले.