रामहिंगनी गावातील शेतकरी परमेश्वर काशिनाथ पाटील यांनी सुरुवातीला दूध व्यवसायासाठी दोन वासरे आणले होते. दुधाला भाव व्यवस्थित असल्यामुळे त्यांनी या व्यवसायाकडे लक्ष घातले. आज त्यांच्याजवळ 15 जर्सी गायी आहेत. तर गाईला दररोज मक्का, कडबा, वैरण दिले जाते. सध्या जर्सी दुधाला 40 ते 60 रुपये लिटर भाव मिळत आहे. परमेश्वर काशिनाथ पाटील हे सकाळी 100 लिटर दूध आणि संध्याकाळी 100 लिटर दूध असे एकूण 200 लिटर दूध दररोज विक्री करत आहे. तर सर्व खर्च वजा करून परमेश्वर पाटील यांनी महिन्याला एक ते दीड लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळत आहे.
advertisement
रामहिंगनी गावासह आजूबाजूला असलेल्या गावातील काही व्यापारी आणि ग्राहक परमेश्वरपाटील यांच्याकडून दूध घेऊन जातात. तर परमेश्वर पाटील हे अर्जुनसोंड, आष्टी, मोरवंची, कान्हेरी, खंडाळी आदी गावात दूध विक्री करतात. शेती करत करत शेतकऱ्यांनी पशुपालनाकडे वळून अधिकाधिक उत्पन्न घेता येईल, असा सल्ला पशुपालक शेतकरी परमेश्वर काशीराम पाटील यांनी शेतकऱ्यांना केला आहे.