मक्याचा सर्वाधिक दर स्थिर
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, 10 डिसेंबर रोजी राज्याच्या कृषी मार्केटमध्ये मक्याची एकूण आवक 39 हजार 284 क्विंटल इतकी झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 7 हजार 084 क्विंटल हायब्रीड मक्याची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार 1060 ते 1830 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 762 क्विंटल मक्यास 3800 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. मंगळवारच्या तुलनेत मक्याच्या सर्वाधिक दरात कुठलाही बदल झालेला नाही. मात्र, इतर दरात घट दिसून येत आहे.
advertisement
AI च्या बेसवर बनवलं जगातलं सर्वात लहान हवामान केंद्र,16 वर्षाच्या हितेनची कमाल, कसं करतो काम? Video
कांद्याला किती मिळाला दर?
आज राज्याच्या मार्केटमध्ये 92 हजार 929 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 45 हजार 789 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 414 ते 1917 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. तसेच नाशिक मार्केटमध्ये आवक झालेल्या 4050 क्विंटल पोळ कांद्यास 500 ते 4601 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. मंगळवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत कांद्याच्या दरात वाढ दिसून येत आहे.
सोयाबीनच्या दरात वाढ
आज राज्याच्या मार्केटमध्ये सोयाबीनची आवक 71 हजार 727 क्विंटल इतकी झाली. लातूर मार्केटमध्ये 19 हजार 416 क्विंटल इतकी सर्वाधिक आवक झाली. त्याला 3728 ते 4524 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. वाशिम मार्केटमध्ये आवक झालेल्या 3600 क्विंटल सोयाबीनला 5800 रुपये इतका सर्वाधिक बाजारभाव मिळाला. मंगळवारी मिळालेल्या सर्वाधिक बाजारभावाच्या तुलनेत सोयाबीनच्या दरात वाढ बघायला मिळत आहे.





