वर्धा: दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू होण्यासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. विद्यार्थी जोमाने अभ्यासाला लागले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना कठीण वाटणाऱ्या विषयांपैकी एक विषय म्हणजे इंग्रजी होय. इंग्रजी विषयाचा पेपर 7 मार्च रोजी असून या विषयात चांगले गुण मिळण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स माहिती असणं गरजेचं आहे. याबाबतच वर्धा येथील इंग्रजी विषयाच्या शिक्षिका सुवर्णा शेळके यांनी माहिती दिली आहे.
advertisement
या प्रश्नांवर करा फोकस
सर्वात पहिला सेक्शन हा लँग्वेज स्टडीवर असतो. हा भाग 10 गुणांसाठी विचारला जातो. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 ए मध्ये तुम्हाला सहा ऍक्टिव्हिटीज दिलेल्या असतात. त्यापैकी चार ऍक्टिव्हिटीज सोडवाव्या लागतात आणि सर्वात जास्त फोकस तुम्हाला याच प्रश्नांवरती करायचा आहे. जर मार्क चांगले कव्हर करायचे असतील तर सहाच्या सहाही ऍक्टिव्हिटीज तुम्ही सोडवा. जेणेकरून तुमचे चार जरी उत्तर बरोबर असली तर तुम्हाला आठ मार्क्स मिळतील. तसेच बी मध्ये दोन ऍक्टिव्हिटीज विचारल्या जातात त्या दोन्ही ऍक्टिव्हिटीज तुम्हाला सोडवायच्या आहेत. दुसऱ्या सेक्शनमध्ये तुम्हाला पॅसेज असतात. म्हणजे पुस्तकाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यामध्ये दोन सीन पॅसेज विचारले जातात. त्याचा तुम्ही सराव करा. जेणेकरून तुमचे मार्क्स कव्हर करता येतील, असं शिक्षिका शेळके सांगतात.
शिक्षण सुखकर करणारी शाळा; परसबाग निर्मितीतून विद्यार्थी घेताहेत धडे Video
पीआर प्रश्नाबद्दल वाचा
परीक्षेमध्ये विचारला जाणारा पीआर म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना कठीण वाटतो. जर पेपर मध्ये सोडवताना हा प्रश्न तुम्हाला कठीण वाटत असेल तर तुम्ही हा प्रश्न स्किप करून त्यावर वेळ न घालवता पुढील प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्या. त्यानंतर हा प्रश्न उरलेल्या वेळेमध्ये सोडवा. जेणेकरून एका प्रश्नावर तुमचा वेळ वाया जाणार नाही.
पोएट्री सेक्शन हा देखील एक महत्त्वाचा पार्ट आहे. या सेक्शनमध्ये पाच मार्कांसाठी पोएट्री म्हणजे पुस्तकातील कवितांवरील प्रश्न विचारले जातात. यमक जुळवा म्हणजेच रायमिंग वर्ड्स किंवा रायमिंग स्कीम आणि तुमच्या पुस्तकातील एखाद्या कवितेचे कवी कोण यासंदर्भातील प्रश्न विचारले जातात. त्यावर तुम्ही फोकस करून सराव करा. हे प्रश्न तुम्ही सोडून देऊ नका किंवा स्किप करू नका तुम्ही हे प्रश्न सोडवायलाच हवेत. त्यानंतर ऍप्रिसिएशन ऑफ पोएम हा भाग असतो. एक मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. अतिशय सोपा असा हा प्रश्न असतो. उत्तर तिथेच असते फक्त आपल्याला योग्य उत्तर लिहिता आलं पाहिजे, असा सल्ला शिक्षिका शेळके यांनी दिला आहे.
कोल्हापूरचा विनायक देणार साहेबांना सल्ला, ब्रिटिश सरकारने सोपवली मोठी जबाबदारी, Video
चौथा नॉन टेक्स्टच्युअल सेक्शन
या सेक्शनचा अभ्यास करताना आणि पेपर सोडवत असताना फक्त आणि फक्त सरावच महत्त्वाचा ठरतो. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हा पॅसेज सोडवताच आला पाहिजे. फक्त सराव करा. पहिली दुसरी आणि तिसरी ऍक्टिव्हिटी फारच सोपी असते. सोडवा. तुम्हाला उत्तर पॅसेज मध्येच सापडतील. त्यानंतर रायटिंग स्किलमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी ऍक्टिव्हिटीज शीट तुम्हाला चांगली समजून घेऊन सराव करण्याची गरज आहे.
ऍक्टिव्हिटी शीटमध्ये विचारले जाणारे फॉर्मल इंफॉर्मल लेटर्स सोडवून बघावे लागतील. तुमचे मार्क्स सहजच कव्हर होतील. त्यानंतर डायलॉग राइटिंग देखील तुम्हाला सोपी जाऊ शकते. फक्त त्याचे ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा. स्पीच किंवा डायलॉग मधील कुठलाही एक विषय तुम्हाला सोडवायचा असतो. त्यामध्ये डायलॉग हा जर तुम्ही सोडवला तर तुमचे मार्क्स कव्हर होऊ शकतात. मात्र जर तुमचं स्पीच रायटिंग चांगलं असेल तर तुम्ही स्पीच देखील लिहू शकता.
इन्फॉर्मेशन ट्रान्सफर यामध्ये व्हर्बल टू नॉनव्हर्बल आणि नॉनव्हर्बल टू व्हर्बल असा भाग दिलेला असतो. व्हरबल टू नॉन व्हरबल वर तुम्ही जास्त फोकस करा. कारण तिथे चुकण्याची शक्यता थोडी कमी असते. त्यानंतर स्टोरी डेव्हलप करण्यासाठी एक प्रश्न विचारला जातो. ज्यामध्ये कधी प्रश्नात स्टोरीची सुरुवात दिलेली असती तर आपल्याला शेवट लिहायचा असतो. तर कधी शेवट दिलेला असतो तर आपल्याला त्याची सुरुवात लिहायची असते.
अनुवाद लेखन महत्त्वाचे
त्यानंतर पाच मार्कांसाठी विचारला जाणारा ट्रान्सलेशन म्हणजे अनुवाद हा भाग असतो. या सेक्शनमध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ट्रान्सलेट करून आपले मार्क्स उत्तमरीत्या कव्हर करता येऊ शकतात. हा प्रश्न तुम्ही अजिबात स्किप करू नका किंवा सोडून देऊ नका. तुम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. कारण पहिले तुम्हाला सहा शब्द दिलेले असतात त्यातील चार शब्द सोडवायचे असतात. त्याचं तुम्हाला मराठीत अर्थ तिथे लिहायचं असतो. त्यानंतर चार वाक्य दिलेले असतात त्या चार वाक्यांपैकी दोन वाक्यांचे अर्थ तुम्हाला मराठीमध्ये लिहायचे असतात. अशाप्रकारे तुम्ही दहावीच्या परीक्षेचे इंग्रजीचा पेपर सोडवू शकता. पूर्ण पेपरचा सराव तुम्हाला करावा लागेल. त्यावरून तुम्हाला पेपर सोडवण्याचा अनुभव येईल आणि पेपरमध्ये विचारले जाणारे प्रश्न सहजरित्या सोडविता येतील, असेही शेळके सांगतात.





