TRENDING:

UPI Fraud: सावधान! सायबर गुन्हेगारांनी शोधलीय नवी टेक्निक, संपूर्ण बँक खातंच करतात रिकामं, जाणून घ्या नवी पद्धत्त

Last Updated:

UPI Jumped Deposit Scam: ‘जम्प टेक्निक’ नावाच्या नवीन सायबर फसवणुकीत UPI वापरकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे. चोर 2000 रुपये खात्यात टाकून व्यवहार सुरू करतात आणि पिन टाकल्यावर मोठी रक्कम काढतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: आजकाल सायबर फसवणूक करणाऱ्यांनी ‘जम्प टेक्निक’ नावाची एक नवी फसवणूक सुरू केली आहे. यात UPI वापरणाऱ्या लोकांना टार्गेट केले जाते. या फसवणुकीद्वारे फक्त काही मिनिटांत तुमचे संपूर्ण खाते रिकामे करू शकतात. तुम्हीही या फसवणूच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचू इच्छित असाल, तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा.
UPI Jumped Deposit Scam
UPI Jumped Deposit Scam
advertisement

जम्प टेक्निक म्हणजे काय?

या फसवणुकीमध्ये फसवणूक करणारा व्यक्ती सर्वप्रथम तुमच्या खात्यात 2000 रुपये इतकी छोटी रक्कम जमा करतो. ही रक्कम तुमच्या खात्यात खरोखर जमा होते आणि तुम्हाला त्याची माहिती देणारा मेसेज किंवा नोटिफिकेशन देखील मिळते. पण खरा खेळ यानंतर सुरू होतो. फसवणूक करणारा व्यक्ती तांत्रिकदृष्ट्या तुमच्या खात्यातून पैसे परत काढण्यासाठी एक सिस्टम सेट करतो. तुम्ही तुमच्या UPI एपवर बॅलन्स तपासण्यासाठी गेलात आणि पिन टाकल्यावर त्याच वेळी तुमच्या खात्यातून फसवणूक करणाऱ्याच्या खात्यात मोठी रक्कम ट्रांसफर होते.

advertisement

या फसवणूकाला कसा सामना द्यायचा?

  • तुमच्या खात्यात कोणत्याही अपेक्षेशिवाय जर कोणतीही रक्कम जमा झाली असेल आणि ती अनोळखी नंबरवरून आली असेल तर ताबडतोब सावध व्हा.
  • UPI वर बॅलन्स तपासण्यापूर्वी जाणीवपूर्वक एकदा चुकीचा पिन टाका. असे केल्याने फसवणूक करणाऱ्याने सेट केलेली ऑटोमॅटिक विथड्रॉल सिस्टम रद्द होईल.
  • तुमचे बँक खाते आणि UPI एप सुरक्षित ठेवण्यासाठी अनोळखी नंबरवरून येणाऱ्या मेसेजेवर कधीही विश्वास ठेवू नका.
  • advertisement

फसवणूक झाल्यास काय करावे? 

जर तुम्ही अशा फसवणूची बळी पडलात तर ताबडतोब 1930 वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा. ही महत्वाची माहिती तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचवू शकते. अशा प्रकरणांमध्ये सतर्कता खूप महत्त्वाची असते. आपण ज्या प्रकारे Digitization (डिजिटलायझेशन) कडे वाटचालो आहोत, त्याचप्रमाणे फसवणूक करण्याच्या नवीन पद्धतीही वाढत आहेत.

advertisement

हे ही वाचा : ऑनलाईन पेमेंट करताय? तर व्हा सावधान! सायबर गुन्हेगारांनी या व्यक्तीचे लुटले 10 लाख

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीला बनवा घरच्या घरी सुगंधित दिवे, अगदी झटपट होतील तयार,संपूर्ण Making Video
सर्व पहा

हे ही वाचा : पोरगी पाहिली लेकाला अन् प्रेम झालं बापाला, लग्नाची तयारी सुरू असताना घेऊन पळालं म्हातारं!

मराठी बातम्या/क्राइम/
UPI Fraud: सावधान! सायबर गुन्हेगारांनी शोधलीय नवी टेक्निक, संपूर्ण बँक खातंच करतात रिकामं, जाणून घ्या नवी पद्धत्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल