कंपनीवर तत्काळ कारवाईची मागणी
या पीडितांची मागणी आहे की, कंपनी चालवणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई केली जावी आणि त्यांचे गेलेले पैसे परत मिळावेत. त्यांनी सांगितलं की, आरोपी सध्या राज्यातच आहेत आणि त्यांची घरं, शेतजमिनी, इतर मालमत्ता आणि बँक खात्यांची चौकशी करून त्यातून आमचे पैसे परत मिळवून द्यावेत.
पीडित लोकांनी सांगितलं की, कंपनीने त्यांना आश्वासन दिलं होतं की, जर त्यांनी पैसे गुंतवले तर सहा महिन्यांत त्यांना दुप्पट परतावा मिळेल. कंपनीच्या लोकांनी परताव्याबाबतची संपूर्ण योजना आणि नियोजन समजावून सांगितलं होतं. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी कंपनीचे मालक स्वतः लोकांशी आणि शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना ही योजना समजावून सांगायचे.
advertisement
विश्वास जिंकून असं लुटलं
सुरुवातीला त्यांनी काही लोकांना छोटे पेमेंट देऊन विश्वास वाढवला. नंतर याच लोकांना पुढे करून त्यांनी इतर शेतकऱ्यांमध्येही 'गुंतवलेले पैसे नक्कीच दुप्पट परत मिळतील', असा विश्वास निर्माण केला. त्यामुळे इतर गुंतवणूकदारांचाही कंपनीवरचा विश्वास वाढला. पण गुंतवणूक वाढताच कंपनीने पैसे देणं बंद केलं आणि शेवटी ऑफिसला कुलूप लावून पोबारा केला.
तक्रारदार जसबीर सिंग आणि अरविंद सिंग यांनी सांगितलं की, त्यांचे एकट्याचे लाखो रुपये कंपनीत अडकले आहेत. कंपनीत 2000 हून अधिक लोकांनी गुंतवणूक केली होती, ज्यामध्ये बहुतेक लहान शेतकरी आणि गावकरी आहेत. चांगला परतावा मिळेल या आशेने या लोकांनी आयुष्यभराची कमाई गुंतवली होती, पण आता सगळंच बुडत असल्याचं दिसत आहे.
एसपी कार्यालयात तक्रार, कारवाईची मागणी
शेकडो पीडित यमुनानगरच्या जिल्हा सचिवालयात जमले आणि त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. पोलिसांनी या आर्थिक गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाई करावी आणि कंपनी चालवणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लोकांनी केली आहे.
यमुनानगर पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीचं आश्वासन दिलं आहे. पोलिसांनी सांगितलं की, सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल. सध्या पोलीस कंपनी चालवणारे कुठे आहेत आणि त्यांचे बँक व्यवहार कसे आहेत, याचा शोध घेण्यात व्यस्त आहेत.
हे ही वाचा : 'या' दिवशी करा पितृकार्य! रुष्ट पूर्वज होतील शांत आणि देतील आशीर्वाद; ग्रहदोष होतील दूर
हे ही वाचा : 2 मुलींनी केलं एकमेकींशी लग्न; मंदिरात घेतले सात फेरे, म्हणाल्या, 'आम्हाला पुरुषांची गरज नाही'