याबाबत अधिक माहिती अशी की, पीडिता ही अल्पवयीन असून 15 जानेवारी 2020 रोजी घरामध्ये एकटी होती. तेव्हा वडिलांनीच तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला घडलेली घटना कोणालाही न सांगण्याबाबत दमदाटी केली. दोन-तीन दिवसानंतर पीडितेची बहीण घराबाहेर जात असतानाच पुन्हा त्याने पीडितेवर अत्याचार केले.
advertisement
वडिलांकडून होणाऱ्या दुष्कृत्याबाबत समजताच पीडितेच्या बहिणीने आईला सांगितले. त्यावरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात नराधम बापाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमासह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवडे यांनी आरोपी नराधम बापास अटक करून तपास केला व न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
दरम्यान, या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश बी. एन. सुरवसे यांच्यासमोर झाली. या प्रकरणी सात साक्षीदारांच्या साक्षी, वैद्यकीय पुरावा ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश सुरवसे यांनी आरोपी बापास 20 वर्षे सक्त मजुरी आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.






