भारती सध्या तिच्या फॅमिलीबरोबर स्वित्झरलँडमध्ये आहे. तिथेच तिने तिच्या फॅमिलीला तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसीची माहिती दिली. तिच्या प्रेग्नंसीची बातमी ऐकून सगळ्यांनाच आनंद झाला. भारतीनं तिचा यंदाचा करवा चौथ देखील स्वित्झरलँडमध्येच साजरा केला. करवा चौथचे फोटो आणि व्हिडीओ देखील तिनं शेअर केलेत.
advertisement
स्वित्झरलँडमध्ये असलेल्या भारतीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. प्रेग्नंसीमध्ये भारतीला डोहाळे लागलेत. तिला सतत काही ना काही खावंस वाटतं. तिने व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात ती म्हणतेय, "गुड मॉर्निंग, माझी हालत बघा, मला असं वाटतंय की मी चांगली दिसत नाहीये. मी आताच अंघोळ करुन आले, पण मला खूप गरम होतंय. अशा अवस्थेत मला वाटतं की गरम होतं."
भारती पुढे म्हणाली, "मला खूप क्रेविंग होतंय. काल रात्री पासून चीज खाण्याचं क्रेविंग होतंय. हे दुसरं बेबी, इतकं खादाड आहे... कधी आइस्क्रिमचं क्रेविंग, कधी स्वित्झरलँडमध्ये बसून राजमा चावलचं क्रेविंग. मला वेगवेगळ्या प्रकारचं क्रेविंग होतंय. मला सोयाचाप घाण्याचं क्रेविंग होतंय. हे बाळ जरा जास्तच खादाड आहे, हर्षसारखा."
भारतीला पहिला मुलगा आहे. त्याचं नाव गोला असं आहे. गोलाचे अनेक व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. भारती दुसऱ्यांदा प्रेग्नंट असली तरी तिला यावेळी मुलगी हवी आहे अशी तिची इच्छा आहे. भारती तिच्या प्रेग्नंसीच्या काळातील सगळे अपडेट तिच्या चाहत्यांबरोबर सोशल मीडियावर शेअर करत असते.