अभिषेक बच्चन आणि निम्रत यांनी “दसवी” सिनेमात एकत्र काम केलं. दोघांनी नवरा बायकोची भूमिका साकारली होती. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या ग्रे डिव्होर्सच्या चर्चांदरम्यान निम्रत कौरसोबत अफेअर्सच्या चर्चा सुरू झाल्या.
( 'तो माझा जावई नाही...', सासूसोबत नेमकं कसं आहे अमिताभ बच्चन यांचं नातं )
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये अभिषेक आणि निम्रत यनवरा नवरीच्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. निम्रतच्या भागांत कुंकू भरलेलं दिसतंय. अभिषेक आणि निम्रत कपल पोझ देताना दिसत आहेत. याच फोटोमध्ये तिसरा फोटो हा ऐश्वर्याचा असल्याचं म्हटलं जातंय. ज्यात ऐश्वर्याला ओळखू येत नाहीये. ती रुग्णालयात असल्याचं म्हटलं गेलं आहे.
advertisement
या फोटोमागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास असं दिसत आहे की हे फोटो खोटे आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक यांचे जुने फोटो मॉर्फ्ड करण्यात आलेत. AI चा वापर करून ऐश्वर्याच्या जागी निम्रतचा चेहरा लावण्यात आलेत. तिसऱ्या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती देखील ऐश्वर्या नाही.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नाला 17 वर्ष झाली आहेत. त्यांना आराध्या ही मुलगी देखील आहे. आधी घटस्फोट आणि त्यानंतर निम्रत कौरसोबत अफेअरच्या चर्चांवर अद्याप अभिषेक, ऐश्वर्या किंवा बच्चन कुटुंबातील कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.