शिरुरमधील पिंपरखेड गावात 12 ऑक्टोबर रोजी एक धक्कादायक घटना घडली. या घटनेशी संदर्भात हेमंत ढोमेनं पोस्ट लिहिली आहे. गावात भर दिवसा एका चार वर्षांच्या मुलीवर बिबट्यानं हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाला. चिमुकलीच्या मृत्यूने संपूर्ण गाव हळहळला. हावात भीतीचं वातावरण असून गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
( हातात घेतला हात अन् बोलला असं काही... भरमंडपात मराठी अभिनेत्रीला कोसळलं रडू; VIDEO )
advertisement
शिरुर पिंपरखेड हे हेमंतचं नाव आहे. हेमंतच्या गावात ही घटना घडली आहे. गावात घडलेल्या प्रकारानंतर हेमंतनं सरकारला ठोस पाऊलं उचलण्याची विनंती केली आहे. हेमंतने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "सदर घटना ही माझ्या गावातील असून अत्यंत दुर्दैवी आहे… आमचे खासदार अमोल कोल्हे यांनी वारंवार या संदर्भात पाठपुरावा केला आहे परंतु सरकार कडून काहीही ठोस पावले उचलली जात नाहीत."
हेमंतने पुढे लिहिलंय, "मानव आणि जंगली प्राण्यांच्या या संघर्षात दोघांनाही जगता यावं या करता दूरगामी उपाययोजनेची गरज आहे. नुसते पिंजरे लाऊन काही होणार नाही. नाहक बळी जात राहणार आणि याचे रूपांतर लोक कायदा हातात घेणार असं होणार"
हेमंतनं शेवटी लिहिलंय, "सरकारने लवकरात लवकर यात लक्ष घालायला हवं! लोक शिक्षण आणि इतर बऱ्याच बाबींची गरज आहे. खूप काही करता येऊ शकतं."