अभिनेता अक्षय केळकर, वैष्णवी कल्याणकर आणि रुची जाईल यांच्या प्रमुख भूमिका असलेली 'काजळमाया' ही हॉरर मालिका येत्या 27 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. रात्री 10.30 वाजता ही मालिका सुरू होणार. काजळमाया सुरू होत असल्याने स्टार प्रवाहवरील 'तू ही माझा मितवा' ही 10.30 वाजता लागणारी मालिका संपणार का असं अनेकांना वाटलं. पण महत्त्वाची अपडेट अशी आहे की, 'तू ही रे माझा मितवा' या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे.
advertisement
'तू ही रे माझा मितवा' ही मालिका आता रात्री 8 वाजता पाहता येणार आहे. 10.30 मालिका आता लवकर म्हणजे रात्री 8 वाजता पाहायला मिळणार त्यामुळे मालिकेचे चाहते खुश आहेत. पण 'तू ही रे माझा मितवा' 8 वाजता लागणार म्हणजेच 8 ला लागणारी 'कोण होतीस तू काय झालीस तू' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का?
'काजळमाया' या मालिकेमुळे मालिकांच्या वेळांची गणितं बदलली आहे. रात्री 8 वाजता लागणारी 'काय होतीस तू काय झालीस तू' ही संपणार नसून या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. ही मालिका आता रात्री 8 ऐवजी रात्री 11 वाजता पाहायला मिळणार आहे. मालिकेची वेळ बदलल्यामुळे मालिकेच्या चाहत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.