प्रेक्षकांनी चित्रपटाची स्तुती करताना सांगितलं की, “अल्लू अर्जुन आणि रश्मिका ही जोडी कमालच आहे, पण त्याशिवाय सिनेमातील त्यांचं काम देखील दमदार आहे. फाहाद फसिल या चित्रपटात एक धमाकेदार एन्ट्री घेऊन आला आहे. याशिवाय चित्रपटामध्ये गाणी, ॲक्शन, ड्रामा या सगळ्यांचं एकदम परफेक्ट टायमिंग जुळून आलं आहे.”
Pushpa 2 The Rule सिनेमा पाहिला अन्.... संभाजीनगरमधील चाहत्यांची पहिली प्रतिक्रिया
advertisement
अल्लू अर्जुनने चित्रपटासाठी घेतलेले कष्ट चित्रपटात दिसले आहेत. त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर अधिक मेहनत घेऊन काम केलंय. ती चित्रपटात दिसली आहे. त्यातील एक सिन मला सर्वाधिक आवडला. हा चित्रपट प्रत्येकानं पाहावा असाच असून सर्वांनी चित्रपटगृहांतच हा चित्रपट पाहावा, असं एक चाहता म्हणाला. तर चित्रपट पूर्ण वेळ खिळवून ठेवतो. या चित्रपटात एक ट्विस्ट असून आता तिसऱ्या भागाची प्रतीक्षा असल्याचं एका चाहत्यानं सांगितलं.
दरम्यान, पुष्पा चित्रपटाच्या यशानंतर चाहते पुष्पा 2 या चित्रपटाची वाट पाहत होते. चित्रपट प्रदर्शीत होण्यापूर्वीच 100 कोटींची कमाई चित्रपटाने केली होती. त्यामुळे सर्वांचं लक्ष पुष्पा 2 च्या प्रदर्शनावर होतं. आज पहिलाच शो हाऊसफुल्ल झाला असून चित्रपटाचं ऍडव्हान्स बुकींग जोरात सुरू आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट पाहण्यासाठी आज फर्स्ट डे फर्स्ट शो पासून चाहत्यांनी गर्दी केलीये.
Confirm! Pushpa 2 नंतर पुष्पा 3 येणार, कधी होणार रिलीज, समोर आली मोठी अपडेट





