वर्धा : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील परिस्थिती अतिशय तंतोतंत मांडणाऱ्या तेरवं चित्रपटाची चर्चा सध्या बघायला मिळत असून हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. शेतकऱ्यांच्या घरची व्यथा या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेषतः चित्रपटामध्ये 90 टक्के कलाकार हे विदर्भातले आहेत. त्यामध्ये वर्धातील कलाकार आहेत. त्यामुळे वर्धेकरांचा अतिशय जवळचा विषय असलेला तेरवं चित्रपट आहे. मूळचे वर्धा येथीलच असलेले दिग्दर्शक हरीश इथापे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
advertisement
काय सांगतात दिग्दर्शक?
चित्रपट तयार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला मात्र प्रश्नांवर बोलण्यापेक्षा त्यांचा शोध घेतला पाहिजे, आणि उत्तरांच्या शोधासाठीच निर्माण केलेला 'तेरवं' हा चित्रपट आहे. शेतीमाती आणि स्त्री सन्मान या विषयावर भाष्य झालं पाहिजे चर्चा झाली पाहिजे. शेतीचा आदर व्हायला हवा आणि महिलेचाही आदर व्हायला हवा. आणि तो घरापासून सुरू व्हायला हवा. अशा प्रकारचा हा चित्रपट तयार केला गेला आहे. टेक्निकल टीम ही मुंबईची असून जास्तीत जास्त कलाकार हे वर्धातले विदर्भातले आहेत. एक चांगला विषयाचा चित्रपट आम्ही प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला होता तो आता यशस्वी झाला आहे असा मला वाटतं, असं दिग्दर्शक हरीश इथापे यांनी सांगितलं.
बाईपण भारी देवा नंतर येतोय 'आईपण भारी देवा'; केदार शिंदेंनी सांगितली रिलीज डेट
महिला कलाकार काय सांगतात?
जे अनुभवी आहेत त्यांना अभिनयाची सवय असते मात्र या चित्रपटामध्ये बऱ्याच ग्रामीण भागातल्या महिला आहेत. त्यांनी जे काम या फिल्ममध्ये केलं आहे, ती रियालिटी आहे त्यांनी अभिनय केला नाही तर ते त्यांचे वास्तविक जीवन आहे. त्यामुळे चित्रपटात काम करताना फारच मज्जा आली आणि या ग्रामीण महिलांपासून बरंच काही शिकायला मिळालं, असं महिला कलाकार सांगतात.
11 वर्षांचा निर्मल देतोय पर्यावरण रक्षणाचे धडे, टाकाऊ वस्तूंपासून साकारलं केदारनाथ मंदिर, Video
इतर कलाकार काय सांगतात?
या चित्रपटामध्ये विदर्भात बोलली जाणारी बोलीभाषा, संस्कृती, पेहरावा या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ उत्तमरीत्या साधला गेला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचे काम चित्रपटातून करण्यात आलं आहे. एका उत्कृष्ट चित्रपटासाठी जे हवं असतं ते या चित्रपटामध्ये आहे. त्यामुळे आमची आंतरिक इच्छा आहे की जेवढ्या ताकदीने हा चित्रपट उभा झालाय. हा चित्रपट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये जावा आणि तिथे सुद्धा हा चित्रपट गाजेल याची मला खात्री आहे, असे संजय इंगळे तीगावकर यांनी सांगितलं.





