बाईपण भारी देवा नंतर येतोय 'आईपण भारी देवा'; केदार शिंदेंनी सांगितली रिलीज डेट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
केदार शिंदे यांनी आईपण भारी देवा या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज केलं आहे. सिनेमाची रिलीज डेटही सांगितली आहे.
मुंबई : जगभरात आज जागतिक महिला दिन साजरा केला जात. आजच्या दिवशी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. 2023 या वर्षात त्यांचा बाईपण भारी देवा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकलीच आणि बॉक्स ऑफिसवर देखील नवा रेकॉर्ड तयार केला. बाईपण भारी देवा नंतर आता केदार शिंदे दिग्दर्शित आईपण भारी देवा हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. महिला दिनाचं औचित्य साधून आईपण भारी देवा या सिनेमाची त्यांनी घोषणा केली आहे.
केदार शिंदे यांनी आईपण भारी देवा या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. "... कारण प्रत्येकाला आई असते" अशी बायलाईन घेऊन आईपण भारी देवा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. "प्रत्येक घरातल्या बाईपणाच्या भारी गोष्टीनंतर दिग्दर्शक केदार शिंदे आणि जिओ स्टुडिओज घेऊन येत आहेत
advertisement
प्रत्येक घरातल्या आईपणाची भारी गोष्ट ‘आईपण भारी देवा’", अशी खास पोस्ट केदार शिंदे यांनी शेअर केली आहे.
बाईपण भारी देवा नंतर आईपण भारी देवा हा सिनेमा देखील प्रेक्षकांची मनं जिंकेल यात काही शंका नाही. बाईपण भारी देवा सिनेमाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. महिलांच्या दररोजच्या जगण्यातील गोष्टी, त्यांची सहनशक्ती हे सगळं बाईपण भारी देवा या सिनेमात दाखवण्यात आलं. त्यानंतर बाईच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असते ती म्हणजे तिचं आई होणं, हे आईपण या सिनेमातून दाखवण्यात येणार आहे.
advertisement
आईपण भारी देवा सिनेमाची घोषणा केल्यानंतर आता सिनेमा नक्की कधी रिलीज होणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर केदार शिंदे यांनी आईपण भारी सिनेमाची घोषणा करताना सिनेमाच्या रिलीजची देखील माहिती दिली आहे. आईपण भारी देवा हा सिनेमा 2025मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
advertisement
त्याचप्रमाणे बाईपण भारी देवा सिनेमात मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींची वर्णी लागली होती. सगळ्या अभिनेत्रींनी सिनेमा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. आता आईपण भारी देवा या सिनेमात कोणत्या अभिनेत्री असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 08, 2024 11:27 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
बाईपण भारी देवा नंतर येतोय 'आईपण भारी देवा'; केदार शिंदेंनी सांगितली रिलीज डेट


