advertisement

बाईपण भारी देवा! एक सिनेमा आणि सगळ्याच ठरल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

Last Updated:

केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा 2023 वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला.


बाईपण भारी देवा!
बाईपण भारी देवा!
मुंबई : संपूर्ण जगात जागतिक महिला दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. महिला या कोणत्याच क्षेत्रात मागे राहिल्या नाहीत. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी उंच भरारी घेतली आहे. सिनेसृष्टीतही महिलांनी बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय. 2023 हे वर्ष मराठी सिनेसृष्टीत महिलाप्रधान सिनेमांनी गाजवलं. एकाच सिनेमात मोठ्या संख्येनं महिला अभिनेत्री दिसल्या. सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी सिनेमामधील एक सिनेमा म्हणजे 'बाईपण भारी देवा'. 2024मध्ये देखील 'बाईपण भारी देवा' या सिनेमाची आणि त्यातील अभिनेत्रींची चर्चा आहे. त्याच कारणही खास आहे.
केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा 2023 वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला. 80-90च्या दशकातील अभिनेत्री ते आताच्या नवोदित अभिनेत्री सिनेमात पाहायला मिळाल्या. या सिनेमाला आणि सिनेमातील अभिनेत्रींना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.
advertisement
नुकताच झी गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात 'बाईपण भारी देवा' या सिनेमानं बाजी मारली. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी गौरव पुरस्कार घोषित करण्यात आला. 'बाईपण भारी देवा' सिनेमातील एक नाही तर सहा अभिनेत्रींना यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी खास पोस्ट लिहित ही माहिती चाहत्यांना दिली.
advertisement
"सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, झी गौरव आम्हा सगळ्यांना मिळाला आणि त्याचप्रमाणे तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांनी जो उत्तुंग प्रतिसाद आम्हाला दिलात त्यामुळे सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट पुरस्कार. झी गौरव ही आम्हाला म्हणजेच तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या चित्रपटाला 'बाईपण भारी देवा! ' ला. असेच प्रेम,आशीर्वाद आयुष्यभर आमच्या बरोबर असू देत,कायम. खास करून तमाम महिलांना मानाचा मुजरा ज्यांनी आम्हाला हा आनंद ,हे उत्तुंग यश दाखवल", अशी पोस्ट अभिनेत्री सुकन्या मोने यांनी शेअर केली.
advertisement
advertisement
'बाईपण भारी देवा' सिनेमाविषयी सांगायचं झाल्यास, सिनेमा अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, वंदना गुप्ते आणि दीपा परब या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत होत्या. 'बाईपण भारी देवा' या सिनेमानं एकूण 50 दिवसात तब्बल 92 कोटींची कमाई केली. सैराटनंतर सर्वोधिक कमाई करणारा 'बाईपण भारी देवा' हा दुसरा मराठी सिनेमा ठरला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
बाईपण भारी देवा! एक सिनेमा आणि सगळ्याच ठरल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement