11 वर्षांचा निर्मल देतोय पर्यावरण रक्षणाचे धडे, टाकाऊ वस्तूंपासून साकारलं केदारनाथ मंदिर, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
वर्ध्यातील 11 वर्षीय निर्मल प्रधान यानं टाकाऊ वस्तूपासून आकर्षक केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारलीय.
अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा: पर्यावरण संवर्धन ही सध्या काळाची गरज बनलीय. वर्धा येथील 11 वर्षीय चिमुकल्यानं त्यासाठी पुढाकार घेतलाय. निर्मल प्रधान असं त्याचं नाव असून तो टाकाऊपासून आकर्षक प्रतिकृती बनवतोय. महाशिवरात्रीनिमित्त त्यानं केदारनाथ मंदिराची प्रतिकृती तयार केलीय. तर यापूर्वीही कचऱ्यातील विविध वस्तूंपासून त्यानं आकर्षक प्रतिकृती तयार केल्या आहेत.
काय सांगतो निर्मल?
"कचऱ्यापासून मी नेहमी वेगवेगळ्या वस्तू तयार करत असतो. लहानपणी पासून मला कचऱ्यात काहीतरी शोधण्याची आवड आहे. त्यातून सापडलेल्या वस्तूंपासून मी आतापर्यंत, सूर्यमाला, चंद्रयान, राम मंदिर आणि काही गाड्या अशाप्रकारे वस्तू तयार केल्या आहेत. आता महाशिवरात्री निमित्त मला एखादे मंदिर बनविण्याची इच्छा होती. कचऱ्यातून पहाड बनविण्यासाठी पोते, बर्फ आणि खांबांसाठी थर्मकोल, कापूस, बॉक्स गोळा केले. 2 - 3 दिवसांत सर्व स्तू जमा केल्या आणि त्यापासून मंदिराची प्रतिकृती तयार केली," असं निर्मल सांगतो.
advertisement
काय सांगतात निर्मलचे वडील?
"निर्मल लहान होता तेव्हापासूनच तो कचऱ्यात काही ना काही शोधायचा. घरातील आगपेटीची डबी असो किंवा त्यातील काड्या असो त्याचा तो वेगळ्या पद्धतीनं वापर करायचा. गाड्या, टेबल अशा प्रकारच्या भरपूर वस्तू बनवायचा. तेव्हाच त्याच्या आवडीबद्दल लक्षात आलं. त्यामुळे आम्ही त्याला कधीच थांबवलं नाही. तो कचऱ्यातील टाकाऊ वस्तूंपासून विविध प्रतिकृती किंवा टिकाऊ वस्तू बनवतो. त्यासाठी आवश्यक थोडंफार साहित्य आम्ही त्याला देतो. आता त्यानं आकर्षक केदारेश्वर मंदिराचा देखावा तयार केला आहे. त्यासाठी तो सात तास काम करत होता," असे निर्मलचे वडील सांगतात.
advertisement
लहान मुलांना द्यावं प्रोत्साहन
view commentsदरम्यान, लहान मुलांना जडलेला छंद हा त्यांची ओळख बनावी यासाठीच निर्मलचे आई वडील देखील त्याला प्रोत्साहन देतात. त्यामुळे निर्मलने आतापर्यंत सूर्यमाला, राम मंदिराचा देखावा तयार केलेला आहे. त्याच्या कलेचं कौतुक शाळेतील शिक्षकांनीही केलंय. निर्मलचा छंद त्याला वेगळ्या उंचीवर नेईल, अशी आशा त्याच्या आई-वडिलांना आहे.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
March 07, 2024 3:16 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
11 वर्षांचा निर्मल देतोय पर्यावरण रक्षणाचे धडे, टाकाऊ वस्तूंपासून साकारलं केदारनाथ मंदिर, Video

