शिवलिंगावर जलाभिषेक करण्याचे नियम माहितीयेत का? ही चूक अजिबात करू नका, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
महादेवाच्या पूजेचे आणि शिवलिंगावरील जलाभिषेकाचे काही नियम पंडित हेमंतशास्त्री पाचखेडे यांनी सांगितले आहेत.
अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा: भगवान शिवाला प्रसन्न करणे सर्वात सोपे असल्याचे धर्म शास्त्रांमध्ये सांगितले आहे. महादेव आपल्या भक्तांवर सहज प्रसन्न होतात म्हणून त्यांना भोलेनाथ म्हणतात. भगवान शंकर शिवलिंगावर जलाभिषेक केल्याने लगेच प्रसन्न होतात, असे मानले जाते. महादेवाच्या पूजेचे आणि जलाभिषेकाचे काही नियम धर्मशास्त्रात सांगितले आहेत. महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करताना काही धार्मिक विधी आणि नियमांचे पालन करावे लागते. याबाबत वर्धा येथील पंडित हेमंतशास्त्री पाचखेडे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
शिवलिंगावर जलाभिषेकाचे नियम
भगवान शिवाची आराधना आणि भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक भक्त शिवपिंडीवर जलाभिषेक करतात. मात्र जल अर्पण करण्यासाठीचे काही नियम आहेत. त्यासाठी सर्वप्रथम एका स्वच्छ आसनावर बसावे. महादेवाच्या पिंडीवर पाणी उभ्याने अर्पण करू नये. तसेच ज्या गडव्याने किंवा पात्राने पिंडीवर पाणी अर्पण करत आहात तो शुद्ध धातूंचा असावा. चांदीचा किंवा सोन्याचा असला तर उत्तम आहे. तसेच तांब्याच्या पात्रातून तुम्ही शिवपिंडीवर जलाभिषेक करू शकता. मात्र कधीही स्टीलच्या भांड्यातून महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकू नये. असे केल्याने शुभ फळ प्राप्त होत नाही, असे पाचखेडे महाराज सांगतात.
advertisement
कसा करावा जलाभिषेक?
शिवलिंगावर जलाभिषेकाची एक पद्धत सांगितली जाते. सर्वप्रथम महादेवाच्या पिंडीवरील डाव्या बाजूला गणपतीचे स्थान आहे. तसेच उजव्या बाजूला कार्तिकेयचं स्थान असते. शिवलिंगावरील गोल भाग हा पार्वतीचा असतो आणि निमुळता समोरील भाग हा विश्वसुंदरीचा असतो. त्यामुळे सर्वप्रथम गणपतीला नंतर कार्तिकीय आणि त्यानंतर विश्वसुंदरी आणि त्यानंतर पार्वती देवी अशा क्रमाने शिवलिंगाला जलाभिषेक करावा. तसेच जलाभिषेक करताना 'ओम नमः शिवाय' हा जप करावा, असे हेमंतशास्त्री पाचखेडे महाराज सांगतात.
advertisement
दरम्यान, सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे. सोमवारी विधि-नियमानुसार भगवान शंकराची पूजा केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. त्यासाठी जलाभिषेक विधीवत करावा. तरच त्याचे चांगले फळ मिळेल, असेही हेमंतशास्त्री सांगतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Wardha,Maharashtra
First Published :
March 06, 2024 8:52 PM IST

