प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती आणि प्लॅस्टिकच्या सजावटीच्या सामनामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे आजकाल इकोफ्रेंडली वस्तूंच्या वापरावर भर दिला जात आहे. देविका आर्ट्सच्या संचालिका कोमल बोरसे यांनी देखील ही बाब गांभीर्याने घेऊन अतिशय स्वस्त दरात आकर्षक असे बाप्पाचे डेकोरेशन बनवले आहेत. देविका गेल्या आठ वर्षापासून आपल्या घरात सजावटीच्या वस्तू बनवतात आणि त्यांची विक्री करत असतात. इकोफ्रेंडली कागद आणि पुठ्ठ्यांपासून तयार केलेलं हे डेकोरेशन फक्त 700 रुपयांपासून मिळत आहे.
advertisement
Thane Shopping: खेळणी, अॅक्सेसरीज आणि बरंच काही, फक्त 50 रुपयांपासून इको-फ्रेंडली ऑप्शन
डेकोरेशन तयार करताना रंगीबेरंगी कागदी फुलांचा वापर केला जातो. त्यामुळे हे डेकोरेशन अतिशय आकर्षक दिसत आहे. याशिवाय देविका यांनी विविध देखावे देखील साकारले आहेत. विठ्ठल-रुक्मिणी आणि गडकिल्ल्यांचे देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. तुम्हाला देखिल देविका यांच्याकडील देखावे आपल्या घरी आणण्याची इच्छा असेल तर 'गुरुसंपदा सोसायटी, घर नंबर 3, महात्मानगर' या पत्त्यावर संपर्क साधता येईल.