Thane Shopping: खेळणी, अॅक्सेसरीज आणि बरंच काही, फक्त 50 रुपयांपासून इको-फ्रेंडली ऑप्शन
- Published by:Vrushali Kedar
- local18
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Thane Shopping: इको-फ्रेंडली, टाकाऊपासून टिकाऊ अशा प्रकारच्या वस्तूंचा प्रचार आणि वापर करण्यावर सध्या भर दिला जात आहे. ठाण्यात चक्क कपड्यांपासून बनवलेल्या विविध वस्तू अगदी 50 रुपयांपासून मिळतात.
ठाणे: सध्या पर्यावरणाची हानी हा जगासमोरील एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे इको-फ्रेंडली, टाकाऊपासून टिकाऊ अशा प्रकारच्या वस्तूंचा प्रचार आणि वापर करण्यावर सध्या भर दिला जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन ठाण्यातील एका खास वर्कशॉपमध्ये 'झुरी' या ब्रँडअंतर्गत कापडी वस्तूंची निर्मिती केली जाते. या वर्कशॉपमध्ये लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांसाठी पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि दर्जेदार वस्तू हाताने तयार केल्या जातात.
या वर्कशॉपमध्ये लहान मुलांसाठी आकर्षक कापडी खेळणी मिळतात. यामध्ये हत्ती, कासव, ससा अशा विविध प्राण्यांच्या खेळण्यांचा समावेश आहे. ही सर्व खेळणी नवजात बाळांसाठीही सुरक्षित आहेत. या खेळणींची किंमत 300 रुपयांपासून सुरू होते. महिलांसाठी येथे 50 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत विविध प्रकारच्या कापडी बॅग्स व अॅक्सेसरीज उपलब्ध आहेत.
advertisement
दोन मीडियम साईज पाऊच 100 रुपयांना, दोन बिग साईज पाऊच 150 रुपयांना, तर ट्रॅव्हलिंग पाऊचेस 150-200 रुपयांच्या दरात मिळतात. स्लिंग बॅग्स 250 रुपयांपासून, पैठणी स्लिंग बॅग्ज 300-350 रुपयांपासून, फ्लॅप बॅग्स 550 आणि पॅचवर्क बॅग्स 650 रुपयांपासून उपलब्ध आहेत. या सर्व वस्तूंमध्ये पारंपरिक आणि आधुनिक डिझाईनचा सुंदर संगम पाहायला मिळतो.
'झुरी'मध्ये महिलांना प्रशिक्षण देखील दिले जाते. या वर्कशॉपमधून अनेक महिलांनी कापडी वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याची संधी मिळाली आहे. महिलांना सक्षम बनवणे, पारंपरिक हस्तकलेला चालना देणे आणि ग्राहकांना टिकाऊ व पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देणे, हा या वर्कशॉपचा उद्देश आहे. तुम्हालाही अशा सुंदर वस्तू बनवायला शिकायचं असेल किंवा खरेदी करायच्या असतील तर 8850604212 या क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकतो.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
August 03, 2025 10:02 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Thane Shopping: खेळणी, अॅक्सेसरीज आणि बरंच काही, फक्त 50 रुपयांपासून इको-फ्रेंडली ऑप्शन