आहारात चिकन आणि मटन दोन्ही असणं वेगवेगळ्या दृष्टीनं फायद्याचं आणि कधी-कधी तोट्याचं देखील असतं. चिकन आणि मटन याचा विचार केल्यास चिकन खाणं जरा अधिक चांगलं मानलं जातं. परंतु, आजारी व्यवक्तीला चिकनपेक्षा मटनाचं सूप देणं जास्त लाभदायी ठरतं. त्यामुळे आजार लवकर बरा होतो, असं आहार तज्ज्ञ सांगतात.
Veg Mutton : शाकाहाऱ्यांचं मटण! वर्षातून फक्त 15 दिवस मिळणारी भाजी, किंमत आणि चव एकदम भारी
advertisement
चिकन खाताना हे लक्षात ठेवा
चिकन खाणं फायद्याचं असलं तरी ते खाताना काही काळजी घेणं देखील गरजेचं असतं. बॉयलर कोंबडीपेक्षा गावरान कोंबडीचं चिकन चांगलं मानलं जातं. त्यामध्ये जास्त प्रमाणात पोषक घटक असतात. चिकन खाताना त्याच्यातील सगळं फॅट काढून टाकलेलं आणि स्वच्छ धुवून घेतलंलं असावं. त्याच्यात जास्त प्रमाणात मसल्यांचा वापर करू नये. फक्त उकडलेलं चिकन खाणं किंवा त्याचं सूप पिणं फायद्याचं ठरतं. त्यातून जास्त प्रमाणात प्रोटिन्स मिळतात, असं देखील आहारतज्ज्ञांनी सांगितलं.
मटनामुळे वाढतो कोलेस्ट्रॉल
आजारी व्यक्तींना मटनाचे सूप आरोग्यदायी मानले जाते. त्यामुळे अनेकदा मटनाचे सूप पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, मटनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढते. त्यामुळे आजारांना निमंत्रण मिळण्याचा धोका असतो. मटन खाणं चांगलं असलं तरी ते प्रमाणात घाण्याची गरज असल्याचं आहारतज्ज्ञ सांगतात.
दरम्यान, मटन की चिकन असा विचार केल्यास चिकन खाणं अधिक चांगलं असल्याचं देखील आहारतज्ज्ञ सांगतात. तसेच आहार कोणताही असो तो प्रमाणात खाणंच लाभदायी असंही देशमुख सांगतात.