डोंबिवली: महाराष्ट्रात वडापाव मिळत नाही असं एकही शहर आणि गाव नसेल. प्रत्येक शहरात वडापावची काही प्रसिद्ध ठिकाणे असतात. मुंबई आणि वडापाव हे तर वेगळंच समीकरण आहे. डोंबिवलीतही गेल्या 40 वर्षांपासून वडापाव मिळणार एक ठिकाण प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे तीच चव आणि तोच स्वाद जपणाऱ्या श्री साईबाबा वडापावस सेंटरला खवय्यांचा तसाच प्रतिसाद आजही मिळतोय. ‘पाटकर वडापाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वडापावच्या स्टॉलवर खवय्यांची नेहमीच गर्दी असते.
advertisement
डोंबिवलीत वडापाव मिळणारी काही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. वर्षानुवर्ष डोंबिवलीकर अशा वडापावच्या स्टॉलवर आवर्जून जातात. डोंबिवली स्थानकापासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर श्री साईबाबा वडापाव सेंटर आहे. हा वडापाव संपूर्ण डोंबिवलीकरांच्या पसंतीची आहे. गेले 40 वर्षांपासून हा वडापाव डोंबिवलीतला टॉप फाईवचा वडापाव मानला जातो. पूर्वी इथे फक्त वडा मिळायचा परंतु आता वडापाव मिळू लागला आहे. यांची चटणी आणि वड्याची भाजी यासाठी अनेक जण लांबून इथे खायला येतात.
वडापाव पेक्षा स्वस्त नाष्टा, फक्त 15 रुपयांमध्ये, डोंबिवलीत एकच गर्दी
उत्तम चविष्ट अशा बटाट्याच्या भाजीने बनलेला गरमागरम वडा आणि त्यासोबत इथे मिळणारा फ्रेश असा मोठा पाव आणि हिरव्या, लाल चटणीने डोंबिवलीकरांच मन जिंकलंय. शेंगदाण्याची चटणी गेली 40 वर्ष स्वतःची चव टिकवून आहे. इथे गेले अनेक वर्ष येणारे खवय्ये सांगतात की, या वड्याचा खमंग सुवास घेऊनच पोट भरल्याची तृप्त भावना मनात येते.
1985 च्या काळात जेव्हा हा व्यवसाय सुरू झाला तेव्हा सर्वप्रथम फक्त इथे वडा आणि साबुदाणे वडे मिळायचे. आजही अनेक जण वडापाव मिळत असला तरीही आवर्जून 2 ते 3 नुसता वडा खातात. हा वडापाव पाटकर शाळेच्या अगदी बाजूला असल्यामुळे या वडापावला पाटकर वडापाव म्हणून सुद्धा ओळखलं जातं. 40 वर्ष तीच चव टिकवून ठेवणं खरंतर खूप कठीण असतं. पण श्री साईबाबा वडापाव सेंटरने मात्र आजही त्यांच्या वड्याची आणि चटणीची चव त्यासोबतच वडा बनवण्याची पद्धत कायम ठेवली आहे.
“आमच्या या वडापावच्या व्यवसायाला 40 वर्षे पूर्ण झाली. आमच्या इथे मिळणारा हा 20 रुपयांचा वडापाव खाण्यासाठी खूप दुरून लोक येतात. पूर्वी आमच्या इथे फक्त वडा मिळायचा पण खवय्यांच्या आग्रहाखातर आम्ही वडापावही सुरू केलाय, असे विक्रेते अमोल यांनी सांगितलं. तुम्ही वडापाव प्रेमी असाल तर डोंबिवलीतील पाटकर वडापाव नक्कीच ट्राय केला पाहिजे.