छत्रपती संभाजीनगर : चिकन किंवा मटनचं नुसतं नाव जरी काढलं तरी आपल्यापैकी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. आपल्यापैकी अनेकांना नॉनव्हेज खायला खूप आवडतं. पण हे नॉनव्हेज खाण्याची कुठली योग्य वेळ आहे? त्यासाठी तुम्ही कुठल्या वेळेत खाल्ल्यानंतर ते तुम्हाला पचायला सोपं जातं? कुठल्या वयोगटातील व्यक्तीने किती नॉनव्हेज खावं? याविषयीचं छत्रपती संभाजीनगर येथील आहार तज्ज्ञ रसिका देशमुख यांनी माहिती दिली आहे.
advertisement
नॉनव्हेज खायची योग्य वेळ कोणती?
सर्व वयोगटातील व्यक्तींनी नॉनव्हेज खाल्लं तरी सुद्धा चालतं. नॉनव्हेज खायची योग्य वेळ आहे ती म्हणजे दुपारच्या जेवणाची. कारण की नॉनव्हेज हे पचण्यासाठी जड असतं. ते पचण्यासाठी आपल्याला जास्त काळ लागतो. त्यामुळे जर तुम्हाला नॉनव्हेज खायचं असेल तर ते तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये खावं. पण आपल्याकडे नॉनव्हेज खायचं म्हटलं तर ते रात्रीच्या जेवणामध्ये खाल्लं जातं. पण ते जर खाल्लं तर तुम्हाला ते पचण्यासाठी देखील अवघड जातं. यामुळे तुमची पचन प्रक्रिया देखील खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे दुपारच्या जेवणातच नॉनव्हेज खायला हवं, असं आहार तज्ज्ञ सांगतात.
Chicken or Mutton: चिकन की मटन, काय खाणं चांगलं? आहारतज्ज्ञांनी दिलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर
तसेच अगदी सहा महिन्याच्या बालकांपासून तुम्ही सर्व वयोवृद्धांपर्यंत नॉनव्हेज खायला देऊ शकता. हा पण त्यांना किती प्रमाणात द्यायचं हे प्रमाण ठरलेलं आहे. लहान बाळ असेल तर त्याला तुम्ही चिकन सूप देऊ शकता आणि पाच वर्षाच्या वरती बालकांना तुम्ही मटण खायला देऊ शकता. तसंच जे तरुण आहेत त्यांनी देखील नॉनव्हेज खावं पण तो योग्य प्रमाणात खावं. जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांनी देखील साधारणपणे तीन ते चार पीस एवढंच नॉनव्हेज खायला हवं. तसेच ज्या गर्भवती महिला आहेत त्या देखील नॉनव्हेज खाऊ शकतात,असं आहार तज्ज्ञ सांगतात.
तर अशा पद्धतीने तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला कुठलाही अपचन किंवा इतर कुठलाही त्रास होणार नाही. हा पण नॉनव्हेज खाताना ते चिकन किंवा मटण फ्रेश असणं गरजेचं आहे, असं देखील आहारतज्ज्ञांनी सांगितलं.
सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.