कोरबा : काही केस गळणं सामान्य असतं, परंतु प्रत्येक वेळी विंचरताना, धुवताना केसांचे पुंजकेच्या पुंजके बाहेर येऊ लागले, तर ही गंभीर समस्या आहे. विशेषतः पावसाळ्यात दमट वातावरणाचा केसांवर परिणाम होतो. प्रामुख्यानं याच दिवसांमध्ये केसगळतीची समस्या सर्वाधिक जाणवते. याकडे वेळीच लक्ष देणं आवश्यक आहे, नाहीतर कधी टक्कल पडेल हे समजणारही नाही आणि त्या भागात पुन्हा केस उगवणं अशक्य होऊन बसेल.
advertisement
केसगळती रोखण्यासाठी महागडे शॅम्पू वापरायला हवे, महागडं तेल वापरायला हवं, ट्रीटमेंट्स करायला हव्या असं काही नाही. तुम्ही घरीसुद्धा व्यवस्थित काळजी घेऊन केसांना पोषण देऊ शकता. घरीच आयुर्वेदिक तेल कसं बनवायचं जाणून घेऊया.
हेही वाचा : फक्त 1 महिना! चरबी गळून पडेल, पोट जाईल आत, वजन होईल कमी; फॉलो करा टिप्स
आयुर्वेदिक विशेषज्ज्ञ डॉक्टर नागेंद्र नारायण शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, केमिकलयुक्त तेल वापरण्यापेक्षा केसांसाठी आयुर्वेदिक तेल वापरणं कधीही चांगलं. यामुळे वेळीच केसांचं झडणं रोखता येऊ शकतं.
आयुर्वेदिक तेल बनवण्यासाठी आपण तीळ, मोहरी किंवा नारळ यापैकी कोणत्याही एका तेलाचा वापर करू शकता. समजा आपण खोबरेल तेल घेतलं, तर ते लोखंडाच्या कढईत गरम करून त्यात रीठा, मेथीचे दाणे, मोहरी, कढीपत्ता अॅड करा. आता मिश्रण बारीक आचेवर शिजू द्या. जेव्हा मिश्रणाचा रंग बदलू लागेल तेव्हा त्यात आवळा पावडर मिसळा. पुन्हा एकदा हे मिश्रण बारीक आचेवर शिजवा. 10 मिनिटं शिजल्यानंतर मिश्रण थंड होऊ द्या. आता आपल्या केसांना पोषण मिळेल असं आयुर्वेदिक तेल तयार आहे. या तेलाचा वापर करून आपण केसांचं झडणं, केसगळती कमी करू शकता. यामुळे हळूहळू केस घनदाटसुद्धा होऊ शकतात.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.