आठवड्यातून केस कितीवेळा धुवावे? तेल कधी लावावं? 99 टक्के लोक एकच चूक करतात
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आजकाल कमी वयात केवळ केसगळतीचा त्रास होत नाही, तर अगदी विशीतच टक्कल पडतं. एकदा केस गेले की, त्या व्यक्तीचं वय आहे त्यापेक्षा जास्त दिसू लागतं.
रामकुमार नायक, प्रतिनिधी
रामपूर : केस हा सौंदर्यातील एक महत्त्वाचा घटक असतो. लांबसडक, काळेभोर केस कोणाला नाही आवडत...परंतु सध्या आपलं आयुष्य एवढं धावपळीचं झालंय की, केसांची व्यवस्थित काळजी घ्यायालाही आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो. शिवाय अवेळी जेवण, अपूर्ण झोप या सवयींमुळे केस गळतात ते वेगळेच. अनेकजण केसगळतीच्या समस्येने त्रासलेले असतात. तुम्हीसुद्धा यापैकी एक असाल तर अजिबात काळजी करू नका. काही साध्या-सोप्या सवयी तुमच्या केसांना नवजीवन देऊ शकतात. याबाबत तज्ज्ञ काय सांगतात, पाहूया.
advertisement
आजकाल कमी वयात केवळ केसगळतीचा त्रास होत नाही, तर अगदी विशीतच टक्कल पडतं. एकदा केस गेले की, त्या व्यक्तीचं वय आहे त्यापेक्षा जास्त दिसू लागतं, म्हणजेच ती तिच्या वयापेक्षा मोठी वाटते. शिवाय गळणाऱ्या केसांना थांबवणं खूपच कठीण असतं. केसगळतीची कारणं वेगवेगळी असतात. ती ओळखणं हाच मोठा टास्क असतो.
advertisement
कारण ओळखा!
डॉ. विनोद कोसले सांगतात की, आजकाल केसगळतीची समस्या सर्वसामान्य झालीये. पूर्वी केसांना केवळ तेल लावलं जायचं. फार फार तर खोबरं किंवा इतर काही घरगुती उपाय केले जायचे. परंतु आता मात्र केसांवर पार्लर ट्रिटमेंट घेण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय. त्यामुळे केस मोठ्या प्रमाणात डॅमेज होण्याची शक्यता असते. याव्यतिरिक्त शरिरातील लोहाची कमतरता, थायरॉइड, पीसीओडी, असंतुलित हॉर्मोन्स, पोषक तत्त्वांची कमी, इंफेक्शन हीसुद्धा केसगळतीची कारणं आहेत. त्यामुळे आधी केसगळतीचं मुख्य कारण ओळखणं आणि त्यावर योग्य उपचार घेणं आवश्यक असतं.
advertisement
हेही वाचा : मुलांमध्ये मोबाइलचा वापर वाढला, आताच घ्या ही काळजी अन्यथा बसेल मोठा फटका, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
कमीत कमी तेल लावा!
डॉ. विनोद कोसले यांनी सांगितलं की, सकाळी केस धुवायचे असतील तर आपण रात्री तेल लावतो किंवा आंघोळीनंतर लावतो. परंतु असं न करता शॅम्पूने केस धुवण्याच्या तासभर आधी केसांना तेल लावा. शिवाय केसांना तेल लावून बाहेर पडू नका. कारण जिथे तेल असतं तिथे धूळ चिकटते. त्यामुळे कोंडा होऊ शकतो. आठवड्यातून किमान दोनवेळा शॅम्पूने केस धुवा आणि कमीत कमी तेल लावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
advertisement
(सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. हे एक वैयक्तिक मत आहे. आपण यापैकी कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
Location :
Raipur,Chhattisgarh
First Published :
April 29, 2024 10:13 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
आठवड्यातून केस कितीवेळा धुवावे? तेल कधी लावावं? 99 टक्के लोक एकच चूक करतात