वजन आपोआप होईल कमी, सगळंकाही खा पण 'हे' 3 पदार्थ चूकवू नका!

Last Updated:

आपल्या चांगल्या सवयींमुळेच आपलं शरीर निरोगी आणि सुदृढ राहू शकतं. घरच्या जेवणामुळे आपण निरोगी आयुष्य जगू शकतो.

यात खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात.
यात खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात.
आकांक्षा दीक्षित, प्रतिनिधी
नवी दिल्ली : अवेळी जेवण आणि धावपळीचं वेळापत्रक यामुळे सध्या अनेकजण वजनवाढीच्या समस्येने त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी लोक कित्येक उपाय करतात. अनेक औषधं खातात. परंतु आहारतज्ज्ञ सांगतात की, आपल्या घरातच काही पदार्थ असे असतात ज्यांमुळे आपण सहज वजन कमी करू शकतो.
'डायट टू नरिश'च्या को-फाउंडर प्रियंका जयसवाल या 10 वर्षांहून अधिक काळापासून लोकांना हेल्थी डायटबाबत टिप्स देतात. त्या सांगतात, आपल्या चांगल्या सवयींमुळेच आपलं शरीर निरोगी आणि सुदृढ राहू शकतं. घरच्या जेवणामुळे आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. विशेषत: वजन कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा याबाबत त्या काय सल्ला देतात, जाणून घेऊया.
advertisement
मखाना : वजन कमी करण्यासाठी डायटमध्ये मखानाचा समावेश आवर्जून करावा. मखानाला फॉक्स नट्ससुद्धा म्हणतात. यात खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात. सकाळच्या नाश्त्यात मखाना खाणं फायदेशीर ठरतं. आपण भाजूनही मखाना खाऊ शकता. त्यात कोलेस्ट्रॉल आणि सोडियमचं प्रमाण कमी असतं. तर कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, ग्लुटेन-फ्री फ्लेव्होनॉयड भरपूर प्रमाणात असतं. वजन कमी होण्यासह मखान्यामुळे पचनव्यवस्था आणि हृदयाचं आरोग्य सुदृढ राहण्यास मदत मिळते.
advertisement
दालचिनी : आहारतज्ज्ञ प्रियंका जैसवाल यांनी सांगितलं की, वेट लॉसच्या डायटमध्ये दालचिनीचा समावेश असायलाच हवा. यामुळे मेटाबॉलिज्म व्यवस्थित राहतं. शिवाय रक्तातली साखरही नियंत्रणात राहते. आपण संध्याकाळी दालचिनीचा चहा घेऊ शकता. यासाठी जवळपास 150 मि.ली. पाण्यात चिमूटभर दालचिनी मिसळा आणि ते पाणी उकळून प्या.
व्हेजिटेबल सलाड : कच्च्या भाज्यांच्या सलाडमध्ये आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतं. म्हणूनच या सलाडमुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. यात आपण कोबी, पालक, काकडी, दूधी, कांदा, गाजर, टोमॅटो आणि हिरव्या मिरचीचा समावेश करू शकता.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
वजन आपोआप होईल कमी, सगळंकाही खा पण 'हे' 3 पदार्थ चूकवू नका!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement