मुलांमध्ये मोबाइलचा वापर वाढला, आताच घ्या ही काळजी अन्यथा बसेल मोठा फटका, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा जाणवत आहे. पारा हा चाळिशीपार गेला आहे. त्यामुळे अशा या मोसमात डोळ्यांशी संबंधित आजाराचे रुग्णही वाढत आहेत. विशेष करुन शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरीच असून मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करत आहेत. मुलांमध्ये वाढलेल्या या स्क्रीन टाईममुळे रुग्णांमध्ये मुलांची संख्या वाढत आहे. (कृष्ण कुमार गौर, प्रतिनिधी)
रिकाम्या वेळेत तासनतास मोबाईल वापरत असल्याने मुलांना डोळ्यांचा त्रास होत आहे. जोधपुरच्या मथुरादास माथुर हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये ही मुलांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी मुलांच्या कुटुंबीयांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. मुलांना डोळ्यांचा कोणत्याही प्रकारच्या आजाराचा सामना करावा लागू नये म्हणून मुलांची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement