हळद: हळदीमध्ये कर्क्युमिन हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी घटक असतो. हे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते, रक्तशुद्धी करते आणि सर्दी-खोकल्यासारख्या संसर्गांपासून संरक्षण देते.
उपयोग: रोज रात्री गरम दूधात हळद मिसळून घ्या.
भूक-तहान नसताना खाणं-पिणं करताय? वेळीच थांबा, अन्यथा होतील गंभीर आजार! आयुर्वेद काय सांगतं?
advertisement
आलं: आलं हे नैसर्गिक अँटीबायोटिक आणि अँटीवायरल गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. पावसाळ्यात होणारा अपचनाचा त्रास, घशातील खवखव आणि सर्दी यावर आले खूप उपयुक्त आहे.
उपयोग: आलं चहा किंवा गरम पाण्यात मधासोबत सेवन करा.
मिरी : मिरी शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि श्वसन मार्ग स्वच्छ ठेवते. यातील पिपरिन हे घटक अन्नातील पोषकतत्त्वांचे शोषण वाढवते आणि रोगप्रतिकार शक्ती सुधारते.
उपयोग: सूप, कढी किंवा चहामध्ये थोडी मिरी पूड टाका.
तुळस: तुळस ही आयुर्वेदातील सर्वोत्कृष्ट औषधी वनस्पतींपैकी एक आहे. तिच्यात अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. तुळस श्वसन संस्थेसाठी अत्यंत लाभदायक आहे.
उपयोग: तुळशीची पाने उकळून चहा तयार करा किंवा रोज सकाळी 4–5 पाने चावून खा.
दालचिनी: दालचिनी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते आणि व्हायरल इंफेक्शनपासून संरक्षण करते. पचन सुधारण्यास मदत करते आणि थंडीमुळे होणाऱ्या शारीरिक त्रासांपासून आराम देते.
उपयोग: चहा, दूध किंवा पाण्यात उकळून सेवन करा.या मसाल्यांचा आहारात योग्य प्रमाणात समावेश केल्यास पावसाळ्यात नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारशक्ती वाढवता येते. हे उपाय घरबसल्या, सहज आणि सुरक्षितपणे करता येतात. जे आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.