पुणे : भारतात मोठ्या शहरांतील हवा प्रदुषण ही गंभीर समस्या बनली आहे. पुणे शहरातही हवा प्रदुषणाची पातळी वाढली आहे. त्यामुळे पुणेकरांना श्वसनाशी संबंधित आजारांचा धोका वाढला आहे. विशेषत: शहरातील हवा प्रदूषणामुळे 'सीओपीडी' (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसिज) या फुफ्फुसांशी संबंधित आजाराने पुणेकरांचे आरोग्य धोक्यात येत आहे. लहान मुलांबरोबरच प्रौढांनाही धोका असणाऱ्या या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी काय काळजी घ्यावी? याबाबत पुणे येथील डॉक्टर सचिन पवार यांनी माहिती दिली आहे.
advertisement
पुण्यात सीओपीडी रुग्णांत वाढ
पुण्यात धूम्रपान आणि प्रदूषित हवेमुळे 'सीओपीडी'चे प्रमाण सातत्याने वाढत आहे. जगभरात श्वसनाशी संबंधित आजारांपैकी 32 टक्के रुग्ण या आजाराने ग्रासले आहेत. हा आजार महाराष्ट्रात 5.7 टक्के तर पुण्यात 12.5 टक्के इतका आहे. धूम्रपान आणि हवेतील प्रदूषणामुळे सीओपीडीचा विषाणू पसरतो. पुण्यात हे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे, असे डॉक्टर पवार सांगतात.
पोटाचा घेर वाढतोय? वजनवाढ ठरू शकते धोकादायक, पाहा काय काळजी घ्यावी? Video
सीओपीडी रुग्णांची लक्षणे
सीओपीडी झालेल्या रुग्णांना सर्दी, खोकला, छाती मध्ये घरघर, अस्वस्थ वाटणे, सतत खोकला येणे अशा प्रकारची लक्षणे आढळून येतात. प्रथम उपचाराने लक्षण थांबली जातात. परंतु, वातावरणात काही बदल झाल्यास किंवा धूम्रपान किंवा हवेतील बदलामुळे ही लक्षणे पुन्हा पुन्हा दिसून येतात. अस्थमाच्या रुग्णांत ही लक्षणे प्रकर्षाने जाणवतात, असेही डॉक्टर सांगतात.
Cancer Treatment : 'या' मसाल्यांनी होणार कॅन्सरवर उपचार, भारतात झालेल्या संशोधनाला मोठं यश!
काय आहे उपाय?
सीओपीडीच्या रुग्णांना आजारावर नियंत्रण आणण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी लागते. त्यासाठी निमोनियाचे इंजेकशन घेणं गरजेचं असतं. तसेच धूम्रपान न करणे किंवा मास्क वापरणे गरजेचे आहे. तर काही वेळा हा आजार अनुवांशिक देखील झालेलं दिसून येतो. लहान मुलं ते वृद्धामध्ये देखील ही लक्षणे आढळू शकतात, अशी माहितीही डॉक्टर पवार यांनी दिली.





