रोहित इंगळे सांगतात की, पावसाळ्यात प्राण्यांना नेहमी कोरड्या आणि स्वच्छ ठिकाणी ठेवावे. शक्यतो त्यांना पावसात न नेणे आणि भिजल्यास त्यांचं अंग नीटपणे कोरडे करणे गरजेचे आहे. दररोज आंघोळ घालणे टाळावे, कारण त्यामुळे त्वचेवरचा नैसर्गिक तेलकटपणा कमी होतो आणि संसर्ग वाढण्याचा धोका राहतो. प्राण्यांचे पाय आणि कान हे बुरशी आणि जीवाणूंसाठी संवेदनशील असतात, त्यामुळे त्यांची नियमित स्वच्छता आवश्यक आहे.
advertisement
Banana Peel Uses : फक्त केळीच नाही, केळीची साल खाणंही फायदेशीर! ही समस्या कायमची संपेल
याशिवाय, वेळेवर लसीकरण केल्यास विविध संसर्गजन्य आजारांपासून प्राण्यांचे संरक्षण करता येते. पावसाळ्यात डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आणि त्वचाविकारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे लसीकरण, नियमित तपासणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच त्यांच्या आहारात पचनास सोपा आणि पोषणमूल्यांनी भरलेला आहार द्यावा.
आजकाल अनेक प्राणीप्रेमी पाळीव प्राण्यांसाठी खास रेनकोट, चप्पल आणि अँटीसेप्टिक स्प्रे वापरत आहेत. हे केवळ त्यांना पावसाच्या पाण्यापासून वाचवत नाही, तर संसर्ग होण्याचा धोका देखील कमी करतात. प्राण्यांचे अन्नधान्य आणि पाण्याची व्यवस्था नेहमी स्वच्छ ठेवावी. भिजलेले अन्न देणे टाळावे, कारण त्यातून जंतुसंसर्ग होऊ शकतो.
पाळीव प्राणी हे कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे पावसाळ्यात त्यांची काळजी घेणे ही मालकाची जबाबदारी आहे. थोडी अधिक काळजी, थोडा अधिक वेळ आणि आवश्यक ती खबरदारी घेतल्यास प्राणी या ऋतूचा त्रास न घेता त्याचा आनंद लुटू शकतात, असं रोहित इंगळे सांगतात.





