जाणून घेऊयात ज्यूस आरोग्यासाठी कसे धोक्याचे ठरतात ते.
शीतपेये दीर्घकाळ टिकावित यासाठी त्यात ब्राउन शुगर, कॉर्न स्वीटनर, कॉर्न सिरप, डेक्सट्रोज, फ्रुक्टोज, हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप, मध, इन्व्हर्टेड शुगर, सुक्रोज, ट्रेहॅलोज, लॅक्टोज, माल्ट सिरप, माल्टोज, रॉ शुगर आणि टर्बिनाडो शुगर अशा विविध रसायनांचा किंवा कृत्रिम साखरेचा वापर केला जातो. या रसायनांना लिक्विड कँडी असं ही म्हटलं जातं. नेचर मेडिसिन जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका लेखात असा दावा केला गेलाय की, कोल्ड ड्रिंक्स किंवा अतिरिक्त साखर असलेली शीतपेये प्यायल्याने दरवर्षी 3.30 लाख लोकांचा मृत्यू होतो. कारण यामध्ये आढळणाऱ्या साखरेमुळे लठ्ठपणा, टाइप 2 डायबिटीस, हृदयविकार, दंतविकारांपासून कर्करोगाला निमंत्रण दिलं जातं. अनेकांना हे ज्यूस किंवा कोल्ड ड्रिंक्स पिण्याची सवय लावली आहे,जी त्यांच्यासाठी जीवघेणी ठरते आहे.
advertisement
कोल्ड ड्रिंक्स आणि सिगारेटचे दुष्परिणाम एकच
वाचून आश्चर्याचा धक्का बसेल मात्र हे खरं आहे. आधी सांगितल्याप्रमाणे शरीरात अतिरिक्त साखर गेल्याने विविध आजारांचा धोका निर्माण होतो. सतत कोल्ड ड्रिंक्स किंवा रेडिमेड ज्यूस पित राहिलं तर त्याचं रूपांतर व्यसनात व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे एकदा का कोल्ड ड्रिंक्स आणि साखरयुक्त पेयांचं व्यसन जडलं की शरीरावर अतिरिक्त साखरेचा मारा सुरूच झाला म्हणून समजा. साधारणपणे दिवसाला 5 ग्रॅमपेक्षा जास्त साखर खाणं धोक्याचं मानलं जातं. मात्र कोल्ड ड्रिंक्स किंवा साखरयुक्त पेयांमध्ये यापेक्षा कितीतरी जास्त साखर असल्याने अशी पेयं तुमच्यासाठी एका विषापेक्षा कमी ठरत नाहीत.
गंभीर आजारांना निमंत्रण
जर तुम्हाला साखरयुक्त पेये पिण्याचं व्यसन लागलं तर ते अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकतं. आधी सांगितल्याप्रमाणे या पेयांमध्ये साखर खूप जास्त असल्याने ही साखर शरीरात जाईल. तिथे तिचं विघटन न झाल्याने ती रक्तात जमा व्हायला लागेल.ज्यामुळे कोलेस्टेरॉल, फॅट्स वाढायला लागतील. यामुळे डायबिटीस, ब्लडप्रेशर, किडनीच्या आजारांसोबतच नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. या व्यसनाती परिणिती कॅन्सरमध्ये व्हायला वेळ लागणार नाही.
पर्याय काय ?
जर तुम्हाला कोल्ड ड्रिंक्स किंवा ज्यूस पिण्याचं व्यसन लागलं असेल आणि तुम्हाला ते सोडवायचं असेल तर ग्रीन टी, ब्लॅक टी हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय होऊ शकतो. याशिवाय बाटलीबंद ज्यूस पिण्यापेक्षा साखर न टाकलेला फ्रेश फ्रुट ज्यूस प्यायला सुरूवात करा. फळांच्या रसापेक्षा फळं खाणं हे केव्हाही फायद्याचं असतं.