महिलांमधे, हृदयविकाराची लक्षणं अनेकदा किरकोळ गुंतागुंत म्हणून दिसू शकतात. त्यामुळे, निदान करणं कठीण होऊ शकतं. पुरुषांमधे हृदयविकाराच्या सामान्य लक्षणांमध्ये छातीत तीव्र वेदना, दाब किंवा जडपणा जाणवतो. बहुतेकदा डाव्या हातापर्यंत ही लक्षणं जाणवतात.
Winter Care : भेगाळलेल्या टाचांवर रामबाण उपाय, या इलाजानं टाचा होतील मऊ
महिलांमधे हृदयविकाराची लक्षणं बहुतेकदा अधिक सामान्य असतात, त्यामुळे ही लक्षणं गांभीर्यानं घेतली जात नाहीत.
advertisement
छातीत दुखण्याचे विविध प्रकार - महिलांना तीव्र वेदनांऐवजी छातीत दाब, जळजळ किंवा अस्वस्थता जाणवू शकते. हे दुखणं छातीच्या मध्यभागी जाणवेलच असं नाही, तर पाठ, मान, जबडा किंवा पोटातही जाणवू शकतं.
श्वास घ्यायला त्रास होणं - कोणत्याही कारणाशिवाय श्वास घ्यायला त्रास होणं हे एक लक्षणं असू शकतं.
असामान्य थकवा - काही कारणांमुळे थकवा येणं वेगळं. पण अचानक तीव्र थकवा येणं हे देखील एक लक्षण आहे. हा थकवा, काही दिवस किंवा आठवडे आधीच सुरू होऊ शकतो. काही वेळा हा थकवा इतका जास्त जाणतो की यामुळे नेहमीची, रोजची कामं करणंही कठीण होऊ शकतं.
चक्कर येणं किंवा डोकं हलक होणं - कारण नसताना चक्कर येणे किंवा संतुलन बिघडणे म्हणजे बॅलन्स जाणं या लक्षणाकडेही दुर्लक्ष करु नका.
मळमळ किंवा उलट्या - पुरुषांपेक्षा महिलांमधे हृदयविकाराच्या झटक्यात मळमळ, उलट्या किंवा अपचन हे जास्त प्रमाणात जाणवू शकतं.
घाम येणं - अचानक थंड घाम येणं, अनेकदा फ्लूसारखं वाटणं.
झोपेचा त्रास - हृदयविकाराच्या काही आठवड्यांपूर्वी झोपेच्या समस्या सुरू होऊ शकतात.
Hair Care : मऊशार केसांसाठी आयुर्वेदिक हेअरमास्क, केसांच्या वाढीसाठी उत्तम उपाय
बऱ्याचदा स्त्रिया ही लक्षणं तणाव, चिंता किंवा वयाचा होणारा परिणाम समजून दुर्लक्ष करतात, पण असं करणं धोकादायक ठरू शकतं. हृदयरोग टाळण्यासाठी, निरोगी जीवनशैली स्वीकारणं महत्वाचं आहे.
निरोगी आहार, नियमित व्यायाम, ताण व्यवस्थापन म्हणजेच स्ट्रेस मॅनेजमेंट, सिगरेट आणि मद्यपान टाळणं आणि नियमित आरोग्य तपासणी करणं आवश्यक आहे.
