TRENDING:

शिक्षक झाले अधिकारी अन् विद्यार्थी मतदार, चक्क शाळेत पार पडली निवडणूक!

Last Updated:

लोकशाही सदृढ करायची असेल तर निवडणूक स्वच्छ व पारदर्शक होण्याची गरज असते. अहमदनगरमधील शाळेतच निवडणूक पार पडली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदनगर, 31 जुलै: लोकशाही सदृढ करायची असेल तर निवडणूक स्वच्छ व पारदर्शक होण्याची गरज असते. त्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना लोकशाही शिक्षण देण्याची आवश्यकता असते. शालेय शिक्षणात नागरिकशास्त्र शिकवलं जातं. पण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून नागरिकशास्त्र शिकवण्याचा यशस्वी प्रयोग अहमदनगर जिल्ह्यातील शाळेनं केला आहे. विशेष म्हणजे मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी निवडणुकीतून आपले प्रतिनिधी निवडले आहेत. नुकतेच ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
advertisement

कशी पार पडली निवडणूक?

अकोले येथील हिंद सेवा मंडळ संचालित मॉडर्न हायस्कूल येथे विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक घेण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यात साहिल गवळी हा विद्यार्थी प्रतिनिधी तर नुपूर बंदावणे ही विद्यार्थिनी विजयी झाली. नामनिर्देशन झाल्यावर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रचारासाठी वेळ देण्यात आला. मतदानाच्या वेळी अगदी निवडणूक कक्षासारखे वातावरण ठेवण्यात आले होते.

advertisement

शिक्षक झाले मतदान अधिकारी

View More

शिक्षकांनी मतदान अधिकाऱ्याची जबाबदारी सांभाळली. मतदार यादी म्हणून वर्गनिहाय याद्या केल्या. त्यावर मतदान केल्याची विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेतली. मतदान केल्यावर विद्यार्थ्यांच्या बोटास शाई लावण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. शाळेच्या वतीने विजयी उमेदवाराचा सत्कार करण्यात आला. निवडणुकीचे महत्त्व मुलांना पटवून सांगण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी निवडणुकीसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

advertisement

शिकवणीला येणाऱ्या मुलींचं व्हायचं ब्रेन वॉश; नगरमधील लव्हजिहाद प्रकरणात खळबळजनक खुलासा

विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेचे धडे

विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते हे समजून घेण्यासाठी हि निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरणे, अर्जांची छाननी करणे, माघार घेणे, प्रचार करणे आणि प्रत्यक्ष मतदान अशा सर्व प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यात आल्या. या निवडणुकीत दोन जागांसाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यावेळी विद्यालयातील 750 विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

advertisement

विद्यार्थ्यांनी निवडले प्रतिनिधी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गजाआडही खुलली कला! कैद्यांनी कारागृहात बसून काढली चित्रं, इथं भरलंय प्रदर्शन
सर्व पहा

लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपल्या समस्या सुटतील याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. सकाळी 12 वाजता मतदान घेण्यात आले तर सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. विद्यार्थी प्रतिनिधी मध्ये साहिल गवळी 67 मतांनी निवडून आला तर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून नुपूर बंदावणे ही 7 मतांनी निवडून आली. सध्या या विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक प्रक्रियेची सर्वत्रच चर्चा होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
शिक्षक झाले अधिकारी अन् विद्यार्थी मतदार, चक्क शाळेत पार पडली निवडणूक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल